भाजपने संभाजीराजेंची विश्वासार्हता संपवली, प्रवीण गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं

भाजपने संभाजीराजेंची विश्वासार्हता संपवली, प्रवीण गायकवाडांनी स्पष्टच सांगितलं

Pravin Gaikwad on SambhajiRaje Chhatrapati : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष विस्तारासाठी राज्याचा दौरा देखील केला होता. राष्ट्रवादी ते राष्ट्रपती नियुक्त खासदार असा प्रवास केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना राजकारणात अजूनही संघर्ष करावा लागतो आहे. भाजपची खासदारकी स्विकारल्याने संभाजीराजेंची विश्वासार्हता संपली आहे का? असा प्रश्न संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक मते व्यक्त केली.

प्रवीण गायकवाड म्हणाले की संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या शिफारसीने राष्ट्रपती नियुक्त खासदारकी स्विकारली आणि भाजपचे सहयोगी सदस्य झाले. भाजपची विचारसरणी ही पुरोगामी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विरुध्द आहे आणि त्यांनी भाजपचा सन्मान स्विकारला. भाजप तुम्हाला सन्मानाचे पद देतात पण समाजातील विश्वासार्हता संपवतात, हे भाजपचे राजकीय धोरण आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल तेच झाले आणि त्यांची विश्वासार्हता संपली, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

अनिल देशमुखांना सगळंच माहित होतं; ‘त्या’ गौप्यस्फोटावर राऊतही बोलले

संभाजीराजे यांनी राज्यसभेची खासदारकी स्विकारली त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये सांगितले होत की पूर्वी छत्रपती हे पेशवे नेमत होते आणि आता पेशव्यांनी छत्रपती नेमले आहेत, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. इतिहासातील संदर्भाने वर्तमानातील काही विश्लेषण करणे हा काही जातीवाद नाही. असे अरोप करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. फडणवीसांनी सांगवं मी ब्राम्हण नाही. त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीच नाही, असेही गायकवाड म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राजकारण हे व्यवहारावर चालतं. आज पक्षांतर अनेक लोक करतात. ते सहज करतात. अगदी विचारधारेच्या विरोधात जाऊन ते सत्ताकारण करतात. पण, सामाजिक कार्यकर्त्याला नेहमीच असे वाटते की ज्या विचारधारेनं आपण काम करतो तेच पक्ष आपण निवडले पाहिजेत आणि त्यांचच सरकार आलं पाहिजे.

रेल्वे तिकीटांच्या आरक्षणात घोटाळ्याचा वास? अजितदादांना मिळाली चक्क राणेंची साथ

मी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात गेलो होतो. शिवराज्य पक्ष होता. मीही काही काळ अध्यक्ष होतो. त्याला काही यश मिळालं नाही. लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत, अशी एक धारणा आहे. म्हणून पुरुषोत्तम खेडेकरांनी एक प्रस्ताव मांडला की आपण संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष करू. त्यावर माझे आणि त्यांचे मतभेद झाल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube