एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान…

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान…

काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असून समझदार को इशारा काफी है, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग

पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या मनात कोणताही संभ्रम नसून महायुतीतल्या नेत्यांच्या मनात संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आमच्यात कसलाही संभ्रम नाही. अनेक राजकीय नेते भविष्य सांगत आहेत, परंतु त्यांचं काही खरं नाही. मी अधिकृतपणे सांगतो की, येत्या 9, 10, 11 तारखेला काहीही होणार नाही, झालंच तर आमचा विस्तार होणार आहे, त्यामुळे आता समझदार को इशारा काफी है, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच प्रत्येकाने बोलतांना वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं आहे. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहणार हे तिन्ही नेत्यांना पक्कं माहिती आहे. त्यामुळे वावड्या उठवणं बंद करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवारांनीही बंड करीत सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे इतर अनेक नेते सत्तेत आहेत. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे.

संपूर्ण घडामोडी घडल्यानंतर आता विरोधकांकडून एकच सूर लावण्यात येत आहे. तो म्हणजे आता अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रिपदाचीच चर्चा सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.

यावरुन आता अजित पवारच आगामी काळात मुख्यमंत्री होणार असल्याचं दिसून आलं होतं. पण नूकतचं यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना सुनावलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube