धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, फेसबुक पोस्टद्वारे माहिती

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, फेसबुक पोस्टद्वारे माहिती

बीड : राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात झाला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी शहरात धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात झाला आहे. तर या अपघात धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले, ‘मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.’

या अगोदरच भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले.पुणे-पंढरपुर रोडवर फलटणजवळ मालथनच्या स्मशानभूमीजवळ जयकुमार गोरेंची फॉर्च्यूनरएसयूव्ही कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली. प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले.

जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर जखमींना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने झोपेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फॉर्च्युन ब्रिजची रेलिंग तोडून 50 फूट खाली पडल्याचा पोलिसांचा अंदाज होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube