आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त भेटीच्या चर्चांवर दादा भुसेंकडून खुलासा…

आदित्य ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त भेटीच्या चर्चांवर दादा भुसेंकडून खुलासा…

नाशिक : शिंदे गटाचे आमदार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. नाशिकमध्ये ही भेट झाल्याची चर्चा आहे. यामुळं भेटीच्या वृत्तामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या दोन्ही नेत्यांनी गुप्त बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, या भेटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आपण आदित्य ठाकरेंची भेट घेतली नाही, हे सांगण्यासाठी दादा भुसे माध्यमांसमोर थेट नातींना घेऊन समोर आले.

दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये गुप्त भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीच्या वृत्तावर दादा भुसे यांनी खुलासा केला. आपल्या नातीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये आलो असल्याचं भुसे यांनी माध्यमांना सांगितलं. ते आपल्या दोन्ही नातींना कडेवर घेऊन माध्यमांसमोर भूमिका मांडायला आले. यावेळी ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा विषयच नाही. माझी विनंती आहे की, एक छोटीसी कल्पोकल्पित बातमीसुध्दा चुकीची दिशा देते. मी सकाळी मुंबईहून निघालो. दुपारी 12 वाजता नाशिकला पोहोचलो. मी आज 12 वाजता नाशिकात प्रेस कॉन्फरन्सही घेतली. मराठा विद्या प्रसारक संस्थेतर्फे समाज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या कार्यक्रमात मी आज दुपारी २ ते ४ या वेळेत सहभागी झालो. हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, असं भुसे म्हणाले.

‘मोदी@9 ‘च्या 60 हजार पुस्तिकांचे वितरण करणाऱ्या संजय काकडेंना फडणवीसांची शाबासकीची थाप 

या कार्यक्रमानंतर, मी माझ्या खाजगी कारमधून माझ्या नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलो. आज तिचा पहिला वाढदिवस आम्ही नाशिकच्या हॉटेलमध्ये साजरा करतोय. आम्हाला आमच्या नातीचा वाढदिवस मालेगावात लहान मुलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करायचा होता. मात्र पावसाअभावी पिकं करपायला लागली आहे. त्यामुळं आम्ही कुटुंबासाठी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यासं भुसेंनी सांगितलं.

आदित्य ठाकरे यांनीही या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी कुणालाही हुडी घालून भेटायला जात नाही. नाशिकला येण्याचे कारण सांगताना आदित्य म्हणाले की, ग्रेप काऊंटी आणि विवेदा पाहण्यासाठी आलो आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांना शिंदे गटातील नेत्यांना पुन्हा शिवसेनेत घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, कोणासाठी दरवाजे उघडायचे आणि कुणासाठी बंद करायचे हा उद्धव साहेब घेतील. स्वच्छ राजकारण आम्ही करू, असं त्यांनी सांगितलं.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube