Deepak Nikalje : डॉनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
मुंबई : आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुन्हा छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे यांची निवड झाली आहे. आरपीआय (आठवले गट)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
नुकतेच चेंबूर येथे रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ची एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांची निवड करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं अशी भूमिका दीपक निकाळजे यांनी मांडली. मुंबई-ठाण्यासह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
दरम्यान, नुकतेच काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देणारं बॅनर मालाडमध्ये लावण्यात आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. छोटा राजन उर्फ नाना यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य कबड्डी स्पर्धा असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होते. या पोस्टरचा फोटो सोशलवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पोस्टर लावणाऱ्यांना ताब्यात घेतले.