हू इज अनिल बोंडे?; शिवतारेंची चंद्रकांतदादांच्या स्टाईलमध्ये भाजप खासदारावर टीका
Vijay Shivtare On Anil Bonde : पंतप्रधान नरेंद मोदी आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वर्तमानपत्रातील भल्यामोठ्या जाहिरातीनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यात भाजप खासदार अनिल बोंडे (Ani Bonde) यांनी एकनाथ शिंदेंना बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही अशी जिव्हारी लागणारी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) भाजप खासदारावर चंद्रकांतदांदांच्या स्टाईलने हल्लाबोल केला आहे.
50 कुठं अन् 105 कुठं! हाच आमचा मोठेपणा; नाम ही काफी है म्हणत भाजपचा पलटवार
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याच्या पोटनिवडणूक लागली होती. यादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हू इज धंगेकर असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाची जोरदार चर्चादेखील झाली होती. तर, त्यांच्या या प्रश्नाला रवींद्र धंगेकर यांनी आयएम रवी धंगेकर असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी चंद्रकांतदादांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजप खासदार अनिल बोंडेंवर टीका केली आहे.
CM शिंदेंच्या ‘त्या’ जाहिरातीला महाशक्तीचा आशीर्वाद? श्रीकांत शिंदें-अमित शाहंची पर्सनल कामासाठी भेट
बोंडे यांच्या बेडकाच्या टीकेवर बोलताना शिवतारेंनी हू इज अनिल बोंडे असा प्रश्न उपस्थित करत लायकीत राहुन टीका करावी असा जहरी पलटवार केला आहे. तसेच अनिल बोंडे यांची उंची किती आहे असेदेखील विचारले आहे. मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी बोंडेदेखील मंत्री होते. त्यांची संपूर्ण इमेज आणि बुद्धी मला पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शिंदेंना समोर ठेवून अशाप्रकारे वक्तव्य केले असेल तर ही बाब अतिशय दुर्देंवी आहे.
‘CM शिंदेंची माफी मागा, अन्यथा…’; बच्चू कडूंचा भाजप खासदाराला ‘लायकी’ ओळखण्याचा सल्ला
कुणी टीका करावी यालादेखील महत्त्व असते मात्र, टीका कुणी केली हे पाहून त्याला तेवढ्याच ताकदीने उत्तर द्यायला हवं असे शिवतारे म्हणाले. बोंडेंची ही टीका म्हणजे आपण फडणवीसांच्या किती जवळ आहे हे दाखवण्यासाठी अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या विधानाला किती महत्त्व आहे असे म्हणत बोंडेंना विचारून युतीबाबत काही होणार आहे का? असे म्हणत माणसाने लायकीत राहवं असे म्हटले आहे.