‘रश्मी शुक्ला आश्रयास आल्या म्हणून…’; क्लोजर रिपोर्टवरून खडसेंची भाजपवर टीका

‘रश्मी शुक्ला आश्रयास आल्या म्हणून…’; क्लोजर रिपोर्टवरून खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse : फोन टॅपिंग (Phone tapping) प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र आता न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळं या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. द्वेष बुध्दीने आमच्यासारख्यांना त्रास दिला जातो, अन् रश्मी शुक्ला आश्रयास आल्या म्हणून त्यांना निर्दोष सोडल्या जातं. भाजप वॉशिंग मशिनसारखं काम करतं, अशी टीका त्यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी क्लोजर रिपोर्टवर भाष्य केलं. खडसे म्हणाले, अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आहे. राज्य सरकारनेच या संदर्भातला क्लोजर रिपोर्ट सुप्रीम कोर्टात दिला. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. माझा फोन टॅप केला त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनातून प्रश्न विचारला. माझा फोन तीन महिने कुणाच्या आदेशाने टॅप केला? माझं संभाषण कुणासाठी उपयोगात आणण्यात आणलं? रश्मी शुक्ला यांनी माझे फोन टॅप का केले? असे प्रश्न मी विचारले होते. मात्र त्याचे उत्तर मला दिले नाहीत. तर उलट त्या मॅडमला क्लीन चीट मिळाली, असं खडसे म्हणाले.

‘चांद्रयान 3’ चंद्रावर उतरल्यानंतर पंतप्रधान मोदींचे पहिले विधान, अभिमानास्पद… 

खडसे म्हणाले, आमचं म्हणणं न ऐकता, आम्हाला उत्तर न देता सरकार परस्पर क्लोजर रिपोर्ट सादर करत आहे. सरकारचं म्हणतंय आम्हाला इंटरेस्ट नाही, तर सुप्रीम कोर्टाकडे पर्याय तरी काय? गृहखात्याला विनंती आहे की, रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट आग्रहपूर्वक सुप्रीम कोर्टाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला आणि क्लोजर रिपोर्ट मंजूर करून घेतला. शुक्ला यांना निर्दोष करून आणलं. तसा एकनाथ खडसेंचा एन्टी करप्शनचा क्लोजर रिपोर्ट हा चार वर्षापूर्वी गृहमंत्र्यांनी दिला होता. तो क्लोजर रिपोर्ट तुम्ही कोर्टाला स्वीकारायला लावायला पाहिजे. मात्र तसं न करता सरकार परत चौकशी का करायला लावतं?असा सवाल खडसेंनी केला.

ते म्हणाले, एकीकडे द्वेष बुद्दीने आमच्यासारख्यांना त्रास द्यायचा आणि दुसरीकडे रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयास आल्या म्हणून त्यांना निर्दोष सोडलं. भाजपकडून विरोधकांच्या बाबतीत सुडाचं राजकारण केल्या जातं. अन् आश्रयाला येणाऱ्यांसाठी भाजप वॉशिंग मशिनसारखं काम करतं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube