Eknath Shinde : डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान बंद होईल; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

  • Written By: Published:
Eknath Shinde : डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान बंद होईल; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

PM Narendra Modi Mumbai Visit मुंबई : आजचा दिवस सुवर्णअक्षरात लिहण्यासारखा आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले. मोदींकडून महाराष्ट्राला विशेष अपेक्षा आहे. काहींना मेट्रोचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होऊ नये, असे वाटतं होते. डांबरीकरणाच्या नावाखाली काळं-पांढरं करणाऱ्यांच दुकान लवकरच बंद होईल, असा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्याकरिता आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी मिळाली, ती केवळ नरेंद्र मोदींमुळे झाले आहे. मविआच्या काळात राज्याचा विकास ठप्प झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

मेट्रोचे जाळे पूर्ण झाल्यावर रस्त्यावरील 30 ते 40 लाख वाहने कमी होतील, प्रदूषण कमी होणार आहे. मुंबईकरांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आज 20 रुग्णालय सुरू होत आहेत. दोन-अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. 40 वर्ष रस्त्यांवर खड्डे पडणार नाही. यामुळे काळे पांढरे करणाऱ्या लोकांची दुकाने बंद होतील. काही लोक विकासकामांना खोडा घालण्याचे काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या, आपण आपले काम करू, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

सहा महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले, एसटीतून ज्येष्ठांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्सहन भत्ता सरकारने दिले. अनेक जनहिताचे निर्णय सरकारने 6 महिन्यात घेतल्यामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube