Gopichand Padalkar : सत्तेत जरी असलो तरी घर कोंबडा न होता पोस्टमनची भूमिका पार पाडायची !

Gopichand Padalkar : सत्तेत जरी असलो तरी घर कोंबडा न होता पोस्टमनची भूमिका पार पाडायची !

पुणे : आम्ही घरात बसणारे लोकप्रतिनिधी नाही. विरोधात असलो काय आणि सरकारमध्ये असलो काय ? असं कुठ लिहिलयं का ? की, तुम्ही लोकांच्या प्रश्नांकडे दुलर्क्ष करा. लोकांच्या प्रश्नांकडे बघू नका. ही दुसऱ्या लोकांची मानसिकता असेल. विरोधात होतो तेव्हा सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. लोक आमच्याकडे प्रश्न, निवेदन घेऊन येतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालिन सरकारच्या मानगुटीवर बसायचो आणि निर्णय करायाला लावायचो. आज आम्ही सरकारमध्ये आहोत. पण म्हणून कोंबडा न होता. सरकारकडे पोस्टमनची भूमिका पार आहोत अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज, 31 जानेवारी) ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार असून मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तर एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून जल्लोष करण्यात आला.

या आंदोलनावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थी आंदोलकांना भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांशी आम्ही सहमत आहोत. असे सांगत या आंदोलनास आपला पाठिंबा दिला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगण्यात आल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube