PM Modi Mumbai Visit : महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतः घरं भरली, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

PM Modi Mumbai Visit : महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतः घरं भरली, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

मुंबई : ‘ज्यांनी 20-25 वर्ष मुंबई महानगर पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं. केवळ स्वतः ची घर भरण्याचं काम केलं. छोट्या आणि गरिब व्यावसायिकांसाठीची तेव्हाच्या राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रम ही योजना स्थगित केली.’ अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. ते मेट्रो उद्घाटनासाठी आणि जाहीर सभेसाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बोलत होते.

‘मी पंतप्रधान मोदीजींना सांगू इच्छितो की, तुमची मुंबईत प्रचंड लोकप्रियता आहे. 2019 मध्ये मुंबईतच मोदी म्हणाले होते की, डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदलले आहे. लोकांनी या डबल इंजिन सरकारला निवडून दिले पण काही लोकांनी बेईमानी केसा आणि अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार नाही बनू शकले. पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदेंमुळे राज्यात पुन्हा एकदा लोकांच्या मनातील सरकार आले आहे.’

‘आज अनेक कार्यक्रमाचं भूमिपूजन आम्ही करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रम राजकारण कसं असत. पंतप्रधान मोदीजींनी कारोनाकाळात लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरील हातगाडीवरील व्यावसायिकांचा सर्वांचा विचार करून प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रमाची सुरूवात केली मात्र तेव्हाच्या राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने ही योजना स्थगित केली. पण आता पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रमातून पैसा देण्यात येणार आहे.’

‘मोदींनी ज्या ज्या योजना सुरू केल्या त्या त्या योजनांच्या उद्घाटनाला आले आहेत. आज देखील ते 35 किमीच्या टूवे मेट्रोचं उद्घाटनाला आले आहेत. त्यांनी ही नवी संस्कृती निर्माण केली. त्याचबरोबर मुंबईत जे करोडो लिटर पाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडलं जात होतं. ज्यांनी 20-25 वर्ष मुंबई महानगर पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं. केवळ स्वतः ची घर भरण्याचं काम केलं.’

‘मुंबईकरांना कधीही शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही. मी मुख्यमंत्री असताना मी महानगरपालिकेला सांगितले की, हे पाणी समुद्रात सोडण्यासाठछी एसटीपी तयार कराव्या लागतील. पण त्यांना एसटीपीचं कशा तयार करायच्या हे माहित नव्हतं. पण मोदींच्या केंद्र सरकारने महापालिकेला एसटीपीचं कशा तयार करायच्या याच्या नॉर्म सांगितल्या पण अडीच वर्ष हिस्सेदारी मिळणार नाही म्हणून महाविकास आघाडी सरकारने ही योजना होऊ दिली नाही. पण आता हे मोदींच्या सरकारमुळे शक्य झाले आहे. ‘

‘मुंबईच्या रस्त्यांचं परीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की, त्याखालील थरच गायब आहे. त्यामुळे कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले. तर आता बनवण्यात येणार असलेल्या कॉंक्रिटचे रस्त्यांचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube