पवनराजे निंबाळकर हत्याकांडांचा आज अंतिम निकाल; ओमराजेंच्या राजकीय निर्णयाकडे लक्ष
verdict in Pawanraje Nimbalkar murder case मध्ये न्याय मिळणार का? त्याचबरोबर ठाकरेंची साथ सोडण्याच्या ओमराजेंच्या निर्णयकडे सर्वांचे लक्ष
Final verdict in Pawanraje Nimbalkar murder case eyes on Omraje’s political decision : धाराशिव जिल्ह्याचं राजकारण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो पाटील विरुद्ध राजेनिंबाळकर या दोन घराण्यांतील संघर्ष. यातून 20 वर्षांपूर्वी झालेली थरारक हत्या. ज्या हत्येने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजवली होती. कारण ही थरारक हत्या होती धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल पवनराजे निंबाळकर यांची ही हत्या होती. त्यानंतर आज या प्रकरणाचा तबब्ल 20 वर्षांनी निकाल लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय मिळणार का? मात्र त्याचबरोबर ठाकरेंची साथ सोडण्याच्या ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण वडिलांच्या हत्येचा निकाल काय लागतो? त्यानंतर ते आपला राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.
दरम्यान यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी मे महिन्यात निश्चित करण्यात आली होती. मात्र काही आरोपी प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयात उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 16 जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र 16 जूनला देखील या प्रकरणाचा निकाल पुढे ढकलण्यात आला. आज अखेर या प्रकरणा अंतिम निकाल येण्याची आपेक्षा आहे.
नेमकं प्रकरणं काय?
हे प्रकरण 3 जून 2006 रोजी घडलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यासह चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता.
…तर मी शिवसेनेचं पक्षप्रमुखपद सोडायला तयार; वर्धापनदिनीच उद्धव ठाकरेंचं मोठ विधान
या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान राजकीय वैमनस्यातून हा कट रचण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला. प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काहींवर हत्येचा कट रचणे, तर काहींवर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, आरोपींना शिक्षा होते की त्यांची निर्दोष मुक्तता होते, याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.