अखेर विखे पाटलांच्या लढाईला यश! श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवली, शेतकऱ्यांनी मानले आभार

अखेर विखे पाटलांच्या लढाईला यश! श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवली, शेतकऱ्यांनी मानले आभार

Flower Farmers And Sellers Thanked Radhakrishna Vikhe Patil : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिर्डीमधून (Sai Baba temple) एक मोठी बातमी समोर येतेय. श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवण्यात आलीय. याप्रकरणी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडली होती. त्यामुळे श्री साई बाबा मंदिरातील फुलांची बंदी उठविल्याबद्दल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि डॉ. सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले आहेत.

यावेळी समस्त समर्थकांनी, (Assembly Election 2024) शेतकरी आणि फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम आणि अनुभवी आणि डॉ. सुजय दादांसारखे तरुण, तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो, असे वक्तव्य फूल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी केलंय.

शरद पवारांचं पत्र अन् महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; फडणवीसांच्या दाव्याने खळबळ!

हा आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी प्रथमत: साईबाबांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांच्याचरणी समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. यावेळी ते म्हणाले की, साईबाबांच्या आशिर्वादाने हे शक्य झालंय. कोविडनंतर अशा प्रकारचे फूल वाहण्यात बंदी होती. अनेक वर्ष निरंतर चालणारी ही प्रक्रिया होती, साईबाबांच्या चरणी फूल वाहण्याची. कोविडकाळात ही प्रक्रिया बंद झाली. त्याला परवानगी मिळत नव्हती, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट झालं, असं विखे पाटील म्हणाले आहेत.

“भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना, पण मी..”, फडणवीसांनी काय सांगितलं?

विखे पाटील म्हणाले की, मध्ये प्रशासकीय मंडळाने या प्रकरणात घ्यायला पाहिजे होती, ती भूमिका घेतली नाही. आम्ही न्यायालयात गेलो. शेतकऱ्यांची विनंती न्यायालयाने मान्य केली. याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. दरम्यान आता श्री साई बाबा मंदिरातील फूलांची बंदी उठवल्याने शेतकरी वर्गात मोठं आनंदाचं वातावरण आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube