Sanjay Kadam : राष्ट्रवादीचे ‘हे’ माजी आमदार ठाकरे गटाच्या वाटेवर

Sanjay Kadam : राष्ट्रवादीचे ‘हे’ माजी आमदार ठाकरे गटाच्या वाटेवर

मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम (Sanjay Kadam) यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत शिंदे व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे राजकीय डावपेच आखले जात आहे. यातच दापोली-विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम (Ramdas kadam) यांना धक्का देण्याची रणनीती सध्या ठाकरे गटाकडून आखण्यात येत आहे.

माजी आमदार संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पुढील 15 दिवसांमध्ये संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असून, यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय कदम यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

लवकरच कदम यांची घरवापसी होणार असून, ते राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झाल्यानं जिल्ह्यात ठाकरे गट पिछाडीवर गेला आहे. मात्र संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यास पुन्हा एकदा या मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.

राजकीय कारकिर्द
संजय कदम हे सन 2015 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी संजय कदम यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ शिवसेनेकडे पुन्हा खेचून आणला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube