Gulabrao Patil : दुष्काळ पडला, नाही पडला तरी लोकं पुढाऱ्यांना शिव्या देतात…

दुष्काळ पडला, नाही पडला तरी लोकं पुढाऱ्यांना शिव्या देतात...

Untitle (16)

Minister Gulabrao Patil : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सर्वत्र शेतकऱ्यांच्या जमीनी अक्षरश: वाहुन गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरु लागली आहे. अशातच आता सत्ताधारी सरकारमधील एका मंत्र्याने एक वादग्रस्त विधान केलंय. दुष्काळ पडला नाही पडला तरी लोकं पुढाऱ्यांना शिव्या देतात, असं वादग्रस्त विधान मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil ) यांनी केलंय. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलंय. सध्या त्यांच्या या विधानाचीच चर्चा सुरु आहे.

गुंडांच्या समर्थनात भाजप! रोहित पवारांचा सिद्धार्थ शिरोळेंवर हल्लाबोल, CM फडणवीसांचा प्रचार व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बोलताना पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असल्याचं विधान बाबासाहेब पाटील यांनी केलंय.

‘सैयारा’ खरं तर इंडस्ट्रीचा विजय! मोहित सूरी-वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी यांचे मत

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना जळगावच्या चोपडा तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं. या कार्यक्रमात बाबासाहेब पाटील बोलत होते. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलायं, आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत आश्वासन देतो, लोकांना ठरवलं पाहिजे, आपल्याला काय मागायचंय, असं पाटील म्हणाले होते. या विधानानंतर शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

प्राईम व्हिडिओ अन् ऋतिक रोशनची HRX फिल्म्स साकारणार थ्रिलर सीरिज लवकरच सुरू होणार स्टॉर्म’चं शूटिंग

दरम्यान, आधी बाबासाहेब पाटील आणि आता गुलाबराव पाटलांनीही वादग्रस्त विधान केल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.

follow us