मला Jitendra Awhad यांचे लॉजिक समजले नाही, Vinod Tawde यांची टीका

मला Jitendra Awhad यांचे लॉजिक समजले नाही, Vinod Tawde यांची टीका

मुंबई : शिवरायांवरील वक्तव्यावरून सध्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच आता या वादात भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde)यांनी उडी मारली आहे. मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही, अशा शब्दात तावडे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.


तावडे म्हणाले की, मी मुघलांचा इतिहास काढणार होतो असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास नाही काढणार. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे याचा अर्थ अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणं बंद करणार.

मुघलांच्या काळात स्थापत्यशासन खूप चांगलं होतं, त्यांनी कलेला आश्रय दिलं, असं नाही. त्याच्या आधीच्या काळातही असं होतं. अकबर दि ग्रेट ज्याने लाखो हिंदूंची कत्तल केली, ते शिकवणं काढणार. शिवाजी महाराज कुशल प्रशासक कसे होते हे सांगितलं, त्यांचं शौर्य काय आहे हेही सांगितलं.


“मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळत नाही की शाहिस्तेखान शिकवला म्हणजे शिवाजी महाराजाचं शौर्य कळतं. त्यांना असं म्हणायचं आहे का कसाब आला म्हणून करकरे, कामटेआणि ओमाळेंचं शौर्य दिसलं? ते आधीपासूनच शूर होते, त्यासाठी कसाबला येण्याची गरज नव्हती. तरीसुद्धा मला म्हणायचं की मुघलांचा इतिहास म्हणजे कुतुबाशाही, आदिलशाही, निजामशाही शिकवणं बंद केलं पाहिजे, अशा शब्दात विनोद तावडे यांनी आव्हाडांवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube