मी तर मृत्यूची वाट बघत होते, हुंदका आवरत नीलम गोऱ्हे झाल्या व्यक्त…

मी तर मृत्यूची वाट बघत होते, हुंदका आवरत नीलम गोऱ्हे झाल्या व्यक्त…

Neelam Gorhe News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हत. मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दलची सगळी हकीकतच सांगितली आहे. मी तर मृत्यूचीच वाट बघत होते, असे उद्गगार काढत नीलम गोऱ्हे यांनी अश्रूंचा हुंदका आवरत व्यक्त झाल्या आहेत. सुषमा अंधारेंची ठाकरे गटात एन्ट्री झाल्यानंतर ठाकरे गटातील महिला नेत्यांची घुसमट होत असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतरच नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय़ घेतला होता. (I was waiting for death, said Neelam Gorhe crying)

महिला आयोग अध्यक्षपदावरुन चाकणकरांचं निलंबन करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जेव्हा तुम्हाला कुठं जायचं नसतं त्यावेळी ते करण्यासाठीची शक्ती तुमच्याकडे नाही. नाहीच जायचं म्हणत तुम्ही स्वत:ला सातत्याने कंट्रोल करता त्याचवेळी तुम्ही अत्यंत असमाधानी आहात. ठाकरे गटात महिला पदाधिकाऱ्यांना तुम्ही उपसभापती करता, पण तुम्हाला नेता करावंस वाटत नाही. मला नाही केलं ठीक आहे, पण मागील 57 वर्षांत शिवसेनेत दुसरं कोणीच नाही का? त्यावर ते म्हणतील तुम्हाला शिवाजी पार्कवर बोलायला दिलं, मी अनेकदा प्रवक्ता म्हणून बोलले आहे पण पक्षाच्या महत्वपूर्ण निर्णयात मी नाही, त्यामध्ये ठराविक नेतेच असतात, या शब्दांत नीलम गोऱ्हे व्यक्त झाल्या आहेत.

ड्रायव्हर होणार ठंडा-ठंडा कूल-कूल! ट्रक केबिनमध्ये येणार एसी, केंद्र सरकारची घोषणा

तसेच मला चारवेळा आरक्षण नसतानाही आमदारकी मिळाली, प्रवक्तेपद, उपनेतेपद मिळालं. पण स्त्रियांचा सहभाग म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून समानता नसेल तर निर्णय प्रक्रियेमध्ये तर त्याला अर्थ काय? असा संतप्त सवाल यावेळी नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोविड काळानंतर चर्चेची दारं बंद झाली असल्याचा आरोपही त्यांंनी यावेळी केला आहे.

बावनकुळेजी, आधी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या; ठाकरे गटाच्या नेत्यांनं दिलं आव्हान

कोरोनानंतर मग उद्धव ठाकरेंच्या आजारपणानंतर आणखीच मातोश्रीची दारं बंद झाली होती. त्यावेळी मी दुखावली गेली होते. उद्धव ठाकरे यांची आपल्याला काळजी आहे तर आपणच त्यांच्यापासून लांबवणं चागलं म्हणजे अपेक्षाही करायला नको आणि अधिक त्रासही नको व्हायला, असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, आपणच उद्धव ठाकरेंना आपल्या ओझ्यातून मुक्त करावं, असा विचार मनात आला आणि शिंदे गटात प्रवेश केल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, 1998 पासून नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे असताना कार्यरत आहेत. नीलम गोऱ्हे ठाकरे घराण्याच्या जवळच्या असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळे नीलम गोऱ्हे कधी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील? असा अंदाज नव्हता, पण त्यांनी आता ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube