Sachin Aahir : मुंबई मनपाची चौकशी पण पुणे मनपाबद्दल उपमुख्यमंत्री ‘ब्र’ काढत नाही

Sachin Aahir  : मुंबई मनपाची चौकशी पण पुणे मनपाबद्दल उपमुख्यमंत्री ‘ब्र’ काढत नाही

पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई महानगर पालिकेची चौकशी करतात. पुणे महानगर पालिकेत जो गोंधळ चालला आहे. त्याच्या बद्दल एकही ‘ब्र’ काढत नाहीत.’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी केली ते पक्षाच्या केशवनगरमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे गटातील जे लोक ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत होते. त्या आमदार खासदारांची अवस्था काय आहे ? लग्नात जर गेले तर एक हजाराचा पाकीट घेऊन गेले तर विचारतात काय साहेब एवढे पैसे मिळाले आणि एकच हजार देत आहेत. कुठे स्मशानभूमी मध्ये जर गेलं तर लोक म्हणतात कुणाचं वाटोळे करून आलात. अशीही टीका यावेळी अहिर यांनी शिंदे गटावर केली.

मंत्री मंडळ विस्तार 22 तारखेला होणार पण कोणी नाराज होणार नाही. याची खबरदारी शिंदे-फडणवीसांनी घ्यावी. फक्त वैयक्तिक काम आणि वैयक्तिक बदल्या यातच शासन चाललेला आहे. त्यामुळे दुर्दैवाने महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे. मंत्रिमंडळामध्ये महिलांनाच काय तर मुंबईतील एकालाही मराठी माणसाला संधी नाही. शिंदे गटातील एकाला संधी नाही. हे ही दुर्दैव म्हणावे लागेल.

आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. घटनापिठाच्या व्यवस्थेमध्ये सातत्याने निवाडा व्हावा आणि केस चालावी आणि बाजू मांडण्याचे काम आम्ही केला आहे. निवडणूक आयोग लवकर निर्णय घ्या असे मिंदे गट म्हणतात. मात्र त्यांच्या अगोदर आम्ही जेव्हा म्हणत होतो सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकर घ्या त्यावेळी त्यांची बोलण्याची भूमिका नव्हती तरी देखील आम्हाला खात्री आहे की, निवडणूक आयोग आमची बाजू ऐकतील आणि जर नाही ऐकली तर न्यायालयाचे दरवाजे आमच्या आमच्यासाठी उघडे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube