Ajit Pawar : कसबा, चिंचवडची निवडणूक होणारच; जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं

Untitled Design   2023 02 02T150031.977

अहमदनगर : कसबा – चिंचवड निवडणुकीवरून सध्या राज्यात वातावरण पेटलेले आहे. यातच निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. मात्र आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टच बोलले आहे. निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंधच येत नाही, अशा शब्दात एकप्रकारे कसबा व चिंचवड निवडणुका या होणारच असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीबाबत पवार यांना विचारण्यात आले असता पवार म्हणाले, निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही.

भाजपाने पंढरपूरची निवडणूक, कोल्हापूरची देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला होता म्हणजे इतर निवडणुका देखील या बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं.

शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचा आहे, जनता त्यांना निवडून देईल, असे बोलत अजित पवार यांनी एकप्रकारे निवडणुका या बिनविरोध होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

सर्व जाती धर्मांचा आदर करावा द्वेष करू नये
राज्यात सध्या हिंदू संघटनांकडून मोर्चा काढले जात आहे. या मोर्चांना राष्ट्रवादीकडून विरोध केला जात असल्याचा आरोप होतोय. यावर पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, आम्ही कोणाच्याही जाती-धर्माला विरोध करणारी माणसं नाहीत.

ज्याने त्याने आपल्या जातीचा धर्माचा आदर केला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. परंतु आपल्या धर्माचा आपल्या जातीचा आपण आदर करत असताना दुसऱ्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष करून चालणार नाही असं अजित पवार म्हणाले

follow us