विधीमंडळातून जनतेला न्याय देणारच; राम शिंदेंनी विधानपरिषदेचा ‘हेडमास्तर’ होण्याआधीच सांगितलं

विधीमंडळातून जनतेला न्याय देणारच; राम शिंदेंनी विधानपरिषदेचा ‘हेडमास्तर’ होण्याआधीच सांगितलं

Ram Shinde : विधीमंडळाच्या माध्यमातून जनतेला न्याय देणार असल्याचं भाजपचे नेते आणि आमदार राम शिंदे (Ram Shinde ) यांनी विधानपरिषदेचा सभापती होण्याआधीच सांगितलंय. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीयं. या पार्श्वभूमीवर लेटस्अप मराठीने राम शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मी आंबेडकरांचा अनुयायी, काँग्रेसने माझ्या विधानाचा विपर्यास केला : शाहंकडून स्पष्टोक्ती

राम शिंदे म्हणाले, विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झालीयं. निवडणुकीसाठी विरोधक नाहीत, त्यांचे मी आभार मानतो. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्या माझ्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार असून सभापतीपदावर असताना योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडणार असून सर्वच आमदारांना बोलण्यासाठी वेळ देणार आहे. सभागृहात चांगली चर्चा झाली पाहिजे, त्यातून चांगलं फलित झालं पाहिजे, जनतेला विधी मंडळातून न्याय मिळायला हवा, असं राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

तसेच ज्यावेळी उमेदवार जाहीर होतो, अर्ज भरला जातो, तेव्हा कोणी मागणं किंवा देणं काही नसतं. शेवटी सार्वजनिक, सामाजिक, राजकीय जीवनात काम करत असताना आपला कोणत्या दृष्टीने विचार होऊ शकतो हे वरिष्ठांनी पाहिलं आणि जबाबदारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली असल्याचं राम शिंदेंकडून सांगण्यात आलंय.

छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, ‘स ला ते स ला ना ते’ या दिवशी होणार रिलीज

अजितदादा-शिंदेंच्या एकमतानेच माझी उमेदवारी जाहीर..
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महायुतीतील घटक पक्षाचे नेते आहेत. या नेत्यांना विचारात घेऊनच एकत्रितपणे विचार करुन माझी उमेदवारी जाहीर केलीयं. माझ्या मतदारसंघात माझा पराभव अतिशय अल्पशा मताने झालायं. प्रत्येक कार्यकर्ता झिजला, संघर्ष केलायं, कष्ट करुन मेहनत करुन यश आलं नाही पण पक्षाच्या नेतृत्वाने न्याय दिला असल्याचं राम शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलंय.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून मंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु असल्याचं चित्र दिसून आलं होतं. त्यानंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदावरुनही नाराजी उफाळून येत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अखेर विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उद्या सभापतीपदाची घोषणा अधिकृतपणे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube