Letsupp Poll : अजितदादांचं चुकलंच! 100 पैकी 74 लोक म्हणतात…

Letsupp Poll : अजितदादांचं चुकलंच! 100 पैकी 74 लोक म्हणतात…

Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात (Politics)मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला(NCP) अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच अजित पवार यांनी भाजपसोबत(BJP) जाण्याचा निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य? असा पोल लेट्सअप मराठीने घेतला आहे. (letsupp poll Ajit Pawar is wrong! 74 out of 100 people says)

Maharashtra politics; अजित पवारांनी 24 तास आधीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ का घेतली?

गेल्या चोवीस तासांमध्ये या पोलमध्ये 82 हजार जणांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये तब्बल 74 टक्के जणांनी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे मत नोंदवले आहे. तर 26 टक्के जणांनी अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे. हे मतं नोंदविताना काही जणांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अजित पवार सत्तेत; गोगावले म्हणाले, ‘नाराज होऊन काय करता? मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर…’

यामध्ये एका युजरने इडीची कमाल मग दादांची धमाल, दादा आले खरं पण भाजप बाटला…ना आता, दादांमुळे उद्धव साहेब बाटले म्हणत होते ना…आत्ता भाजपचे बेगडी हिंदुत्व…जनतेपुढं आलं, राजकारण कोणत्या थराला गेल आहे पक्ष, विचारधारा, इमानदारी या नावाची गोष्ट राहिली नाही, लढायला पाहिजे होते. किंमत कमी झाली दादांची, या राजकारणी लोकांनीच टीआरपी घेतलाय 2-3 वर्ष झाले. सर्वसामान्यांचे काही आहे का यांना? बुलढाणा अपघाताला 2 दिवस पण झाले नाहीत, लगेच नवीन कपडे घालून आले राजकारण करायला. काय म्हणायचे याला? अशी प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबर काही जणांच्या प्रतिक्रिया अशाही आल्या आहेत की, ही सर्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीच खेळी आहे. त्यात म्हटलंय की, काकानीच पाठवला आहे पुतण्याला, ईडी सीबीआयला घाबरले, ईडी, सीबीआयची भीती घालून शहा व मोदी ब्लॅक मेलिंग करतात, तुम्ही कोणालाही मत द्या शेवटी BJP पळवून घेवून जातो. आता निवडणुकाचं बंद करा, त्याचा काही फायदा नाही. महापालिकेला निवडणूक नाही , नगरसेवक नाही. आमदार, खासदार नसले तरी चालेल, अशा संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

या पोलमध्ये अनेकांनी महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालावण्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी भाजपकडून ईडी, सीबीआयचा धाक दाखवल्यामुळेच अजित पवार आणि त्यांच्याबरोबर काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर जनतेने आता सावध होऊन संधीसाधू राजकारण्यांना चांगला धडा शिकविला पाहिजे, असं आवाहनही या पोलच्या माध्यामातून लोकांनी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube