ज्यांनी पाणी अडवलं त्यांना निवडून देणार का? फडणवीसांचा मोहितेंवर घणाघात

तुम्ही विश्वासघात केला असला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर टीका केली.

lok Sabha Election : देवेंद्र फडणवीसांनी राज्य पिंजून काढले ! 52 दिवसांत विक्रमी 115 सभा

Devendra Fadnavis : तुम्ही कितीही विश्वासघात केला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे काळजी नाही अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार टीका केली. तसंच, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पवारांना राग आहे. कारण मला 50 वर्षात जे जमलं नाही ते 5 वर्षात याने केलं. आणखी 5 वर्ष मिळाते तर हा काय करेलं याची त्यांना भीती आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

 

तरीही विश्वासघात केला

ज्यावेळी शरद पवारांनी यांच राजकारण संपवण्याचा घाट घातला होता तेव्हा आम्ही यांना साथ दिली. फक्त साथच दिली नाही तर यांचं राजकीय पुनर्वसन केलं आणि आणखी काय काय केलं हे मी इथ उगाळणार नाही. परतु, हे करूनही यांनी विश्वासघात केला असंही फडणवीस यावेळी म्हणाले. तसंच, ज्या लोकांनी आजपर्यंत पाणी अडवलं त्यांना आपण निवडून देणार का? असा प्रश्नही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

 

काही पोपट बोलायला लागलेत

पोपटांना विमानात बसून तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात. ते आता अजित पवारांवर बोलतात, मोदींवर बोलतात. त्यांना वाटत मी राष्ट्रीय नेता झालोय अशा शब्दांत फडणवीसांनी नाव न घेता उत्तमराव जानकरांवर टीका केली. तसंच, आम्हाला वाटलं होतं हे संघर्ष करतील परंतु यांनी समझोता केला अशा शब्दांत फडणवीसांनी जानकरांवर जोरदार टीकाही यावेळी केली.

follow us