“घाम गाळून पिकवलेल्या कांद्याला ₹२-३ इतका मातीमोल भाव मिळाल्याने, निराश झालेला शेतकरी अश्रू गाळत कांद्याची होळी करतोय. शेतकऱ्यांच्या घामाची-अश्रूंची जाणीव ठेवून,सरकारने तातडीने अनुदान जाहीर करावं.” अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांनी आज कांदा पिकाची होळी केली, त्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. कांद्याला भाव […]
कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार निशाणा साधला होता. त्याचवेळी सोमय्यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनीषा वायकर (Manisha Waykar) यांच्यावर 19 बंगल्याचा आरोप केला होता. या सर्व गोष्टीसमोर आल्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारनं तेथील रेकॉर्ड, पुरावे कशा पद्धतीनं नष्ट केल्याचे पुरावे रेवदंडा पोलीस (Police)ठाण्यात दिल्याचं […]
Ambadas Danve On Imtiaz Jaleel : “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांचं संसदेचं सदस्यत्व रद्द करा” अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. औरंगाबाद शहराच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) असं नामांतर झालं आहे. या नामांतराला विरोध […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले आहे. या निर्णयाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्याने अधिकृतपणे आता सरकारी कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी संभाजीनगर नावाचा उल्लेख केला जात आहे. पण यानिर्णयाच्या विरोधात संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या निर्णायाला पाठिंबा म्हणून एक युवक थेट लग्न झाल्यानंतर या आंदोलनस्थळी दाखल झाला […]
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापलेले आहे. अशाच प्रकारे सोशल मीडियावर देखील कार्यकर्त्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका तरुणाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Eknath Shinde-Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट (Offensive tweets) केले होते. त्या तरुणाविरोधात नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हा दाखल झाला आहे. तो ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. […]