‘बीआरएस’चे नागपूरमध्ये पक्ष कार्यालय… भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रस्थापितांना हादरे देण्याची तयारी

‘बीआरएस’चे नागपूरमध्ये पक्ष कार्यालय… भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रस्थापितांना हादरे देण्याची तयारी

BRS Party Office in Nagpur :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) महाराष्ट्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र त्यानंतर आता विदर्भाकडे पक्षाने मोर्चा वळवला आहे. पक्षात नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची इनकमिंग तर सुरू आहेच पण, आता पक्ष कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील नागपूर शहराची निवड केली आहे.

आज नागपुरात बीआरएसच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त पक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव नागपुरात येत आहे. राव यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पक्षाच्या या खेळीने भाजपमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही बीआरएसच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहे.

मला तर BRS चा फुल फॉर्मही माहित नाही, पक्षप्रवेश दूरच; ढाकणेंनी चर्चांना दिला पूर्णविराम

बीआरएसचे महाराष्ट्रातील पहिले कार्यालय नागपुरात सुरू होणार आहे. यासाठी पक्षाने तयारी पूर्ण केली आहे. ठिकठिकाणी केसीआ यांच्या फोटोसह अबकी बार किसान सरकार असे घोषवाक्य असलेले फलक लागले आहेत. आज दुपारी कार्यालयाचे उद्घाटन होईल. त्यानंतर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला राव संबोधित करतील.

भाजपाच्या बालेकिल्ल्यात पहिले कार्यालय

तसे पाहिले तर विदर्भ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो. येथील अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा मतदारसंघातील खासदार भाजपाचे आहेत. येथेच आता बीआरएसने कार्यालय सुरू करत भाजपला आव्हान दिले आहे. पक्षाने 1 जूनपासून सदस्य नोंदणीही सुरू केली आहे. पक्षाला येथे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचाही दावा केला जात आहे. यानंतर आता पक्षाची काय रणनिती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नगरमध्ये बीआरएसचे राष्ट्रवादीला खिंडार

आहे. त्यातच आता भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगर जिल्ह्यात पक्षाने हातपाय पसरले आहेत. काल नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते घनश्याम शेलार यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. शेलार यांच्यानंतर आणखीही काही नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, जिल्ह्यात अद्याप तशा काही हालचाली दिसत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube