‘महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल’ ; गॅस दरवाढ वीजतोडणीविरोधात विरोधकांचा हल्लाबोल
Mahrashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी (Maharashtra Budget) आणि विरोधकांत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा (Onion) आणि कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशी गॅस दरवाढ (Gas Price Hike) आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा : गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी
‘शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा.’ ‘घरगुती गॅस दरवाढ करणार्या सरकारचा धिक्कार असो.’ ‘शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो.’ ‘शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा.’ ‘वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही, पिकावाचून मरतोय शेतकरी, सरकारला देणंघेणं नाही.’ ‘शिंदे सरकारने केलं काय, जाहिरातीशिवाय दुसरं काय ?.’ ‘पिकाला नाही पाणी, मालाला नाही भाव, अरे सरकारा कधीतरी बळीराजाला पाव.’ ‘महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
कांद्याचा मुद्दा राजकीय गुद्दा, विधीमंडळातही घमासान; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केली घोषणा..
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध यावेळी करण्यात आला.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे सरकारला सळो की पळो करून सोडले.
https://www.youtube.com/watch?v=X1zSKzw9xnQ