Devendra Fadanvis : तुम्हाला जर वाढवायचे असेल तर…; फडणवीसांचा विरोधकांना गर्भित इशारा

Devendra Fadanvis : तुम्हाला जर वाढवायचे असेल तर…; फडणवीसांचा विरोधकांना गर्भित इशारा

विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले होते. यावरुन काँग्रेस नेते जोरदार आक्रमक झाले आहेत. ज्या सदस्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येते आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. अशा प्रकारे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन हे चुकीचेच आहे. त्याचे समर्थन मी करत नाही. पण गेल्या सहा महिन्यांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. त्यांना खोके, चोर, मिंधे म्हणणं हे सभागृहाला मान्य आहे का. ज्यांच्यावर कारवाई करायची असेल तर मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे  बोलणाऱ्यांवर देखील कारवाई कारवाई केली पाहिजे. दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय ? ; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल

यानंतर काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी वरच्या सभागृहातील नेते यामध्ये सामील होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यानंतर फडणवीसांनी त्यांना जोरदार उत्तर दिले. हे जर वाढवायचे असेल तर मुख्यमंत्र्यांवर बोलणाऱ्यांवर देखील कारवाई करावी लागेल असे म्हणत त्यांनी विरोधकांना गर्भित इशारा दिला आहे. वरच्या सभागृहातील लोक हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात पुढे होते त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Pakistan : काश्मीरवर बोलले, पाकिस्तानींना भर कार्यक्रमातून हाकलले; अमेरिकेतील प्रकार..

दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विधानसभेमध्ये बोलले आहेत. काल विधिमंडळाच्या आवारात जो प्रकार घडला त्याचे समर्थन आम्ही करत नाही. याबाबत आमची बैठकही झाली आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून आमचे फोटो लावून खोके म्हणणे, आम्हाला चोर म्हणणे, मिंधे म्हणणे, गद्दार म्हणणे हे कोणत्या आचारसंहितेत बसते, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणं, मिंधे म्हणणं. चोर म्हणणं हे कोणत्या आचारसंहितेत बसतं नाना ?, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना उद्देशून केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube