दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापना; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय

Cabinet Decisions दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, मुंबई मेट्रो प्रकल्पबाधितांना विकसित भूखंड आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी.

Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून महसूल मंत्री या समितीचे अध्यक्ष असतील. दुष्काळाशी संबंधित परिस्थितीनुसार आवश्यक ते निर्णय घेण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. तसेच येत्या शनिवारपर्यंत दुष्काळासंदर्भातील प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार आहे. राज्यातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार असून, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच मंत्रीमंडळाने आजच्या बैठकीत अजून काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

ब्रेकिंग: भारताला सुवर्णपदक! महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर 147 धावांनी दणदणीत विजय

मुंबई मेट्रो प्रकल्पाबाबतही मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4 अ आणि 10 या प्रकल्पांसाठी एकात्मिक कार शेड डेपो उभारण्यासाठी जमीन देणाऱ्या मौजे मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मोघरपाडा येथील सर्व्हे क्रमांक 30 मधील संबंधित शेतकऱ्यांना 22.5 टक्के आणि 12.5 टक्के प्रमाणात विकसित भूखंडांचे वाटप केले जाणार आहे.

“टाटा समूहाचा वारसा जपणे ही काळाची गरज”; शरद पवारांचा नोएल टाटा यांना पाठिंबा

मुंबईतील खार पश्चिम परिसरातील रामकृष्णनगर येथील म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासालाही मंजुरी देण्यात आली आहे. या परिसरातील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास केला जाणार आहे. रहिवाशांना अधिक चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘राका’ने रचला इतिहास, ‘या’ खास कामगिरीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

धुळे शहराच्या विकास आराखड्यातील एका आरक्षणाबाबतही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. धुळे महानगरपालिका हद्दीतील मौजे देवपूर येथील सर्व्हे क्रमांक 103 वरील क्रीडांगण आणि बगीच्यासाठी असलेले आरक्षण रद्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संबंधित जागा सार्वजनिक-निमसार्वजनिक विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साहिल वाकोडे प्रकरणात आयआयटी बॉम्बेने मागितली माफी, म्हणाले त्याच्या कॉपीबद्दल तपासापूर्वी सांगणे…

दरम्यान, कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंध रद्द करून 2009 मध्ये मंजूर झालेला आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्यात येणार आहे. कृषी विभागाचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यासाठी विभागाच्या कार्यभाराचा आणि उपलब्ध मनुष्यबळाचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे.

यामध्ये विभागातील रिक्त पदे, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणेची गरज, शेतकरीकेंद्री योजनांचा वाढता कार्यभार तसेच भविष्यातील प्रशासकीय गरजा या बाबींचा विचार केला जाणार आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर केला जाणार आहे.

मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला

एकूणच, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारण, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड, मुंबईतील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास, धुळे विकास आराखड्यातील आरक्षण आणि कृषी विभागाच्या प्रशासकीय रचनेशी संबंधित निर्णय घेण्यात आले.

follow us