ठाकरे-केजरीवाल भेटीवर शिंदेंचं उत्तर; म्हणाले, कितीही बैठका घ्या पण, देशात..

ठाकरे-केजरीवाल भेटीवर शिंदेंचं उत्तर; म्हणाले, कितीही बैठका घ्या पण, देशात..

Eknath Shinde : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभर फिरत आहेत. केजरीवालांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेली त्यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भेटीवर खोचक प्रतिक्रिया दिली.

खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत प्रश्न विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, कुणाला कुणीही भेटू शकतो, भेटायला काही अडचण आहे का? भेटले म्हणजे लगेच निवडणुका जिंकतो का कोण? भेटण्यामागे अशी कोणती जादू आहे की कुतूहल आहे? असे खोचक सवाल त्यांनी केले.

अनिल देशमुखांना सगळंच माहित होतं; ‘त्या’ गौप्यस्फोटावर राऊतही बोलले

ते पुढे म्हणाले, देशात हुकूमशाही आहे की नाही हे कोण ठरवणार तर या देशातील 140 कोटी जनता हे ठरवेल. लोकांना सगळं माहित आहे, इतक्या वर्षांपासून कुणी देशाला लुटलं? आणि मागील नऊ वर्षात किती विकास झाला हे सुद्धा लोकांना चांगलच माहित आहे. नागरिक समजदार आहेत. ते वेळ आल्यावर बरोबर निर्णय घेतील असा इशारा शिंदे यांनी दिला.

याआधीही विरोधी पक्षांची अशी एकजूट झाली आहे. याआधी देशील पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोदींच्या नेतृ्त्वातच देश पुढे जाईल. त्यामुळे अशा एकजूट आणि बैठकांनी काही फरक पडत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर 

आता बॅनर लागलेत कुणाला प्रधानमंत्री व्हायचयं कुणाला मुख्यमंत्री व्हायचंय चाललयं असू द्या, असे म्हणत त्यांनी सध्या सुरू असलेल्या भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीवर टीका केली.

आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती फडणवीस-बावनकुळेंची भेट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube