गोकुळचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी महायुतीचा वकिली डाव… पाच सरकार नियुक्त सदस्य नेमण्यास मंजुरी

Gokul : गोकुळच्या कारभारात सरकारनियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 04T145459.313

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या सत्तासमीकरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. गोकुळवर 4 शासननियुक्त तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्वीकृत संचालकांना सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या कारभारात सरकारनियुक्त संचालकांचा थेट हस्तक्षेप होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या गोकुळमध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या गटाचे बहुमत आहे. मात्र, नव्याने नियुक्त होणाऱ्या 4 संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने अध्यक्ष निवडीच्या वेळी सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि विशेषतः सतेज पाटील यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. निवडून आलेल्या संचालकांचे बहुमत डावलून शासननियुक्त सदस्यांच्या माध्यमातून सत्ता बदलण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत सतेज पाटील यांनी या निर्णयाला लोकशाहीची गळचेपी म्हटले होते.

follow us