‘पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये’; औटींचा विखेंवर हल्लाबोल
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.
औटी पुढे म्हणाले, हा मतदारसंघ टिकविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यामुळे आमचे भले झाले. मात्र ज्यांना मतदारसंघ रद्द करण्यासाठी प्रयत्न केला त्यांची याची शिक्षा भोगावी लागली. राज्यात महाविकास आघाडी असल्याने आम्ही तालुक्यात आघाडी केली मग कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फडणवीस भावी मुख्यमंत्री ! बॅनर झळकल्यानंतर फडणवीस म्हणाले, अतिउत्साही लोकांनी..
आमदार लंके यांनीही विखे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, समाज आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आघाडी केली. बाजार समितीच्या विकासासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी कृषी भवनासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
औटींनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली – विखे
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.
Vinayak Raut : मिंधे सरकार जबरदस्ती करतंय, त्रास देतंय, नेमकं चाललंय तरी काय?
ते पुढे म्हणाले, चोर, गुंड, दरोडेखोर म्हणणाऱ्यांची युती एका रात्रीत झालेली नाही. ही खलबतं सहा महिन्यांपासून सुरू होती. हा संघर्ष गरीब लोकांसाठी उभा केलेला आहे. तालुक्याचा विकास जो मागील तीन वर्षात वाळू तस्कर, गुंड , मटका किंग यांचा दावणीला बांधला होता तो तुमच्या पायाशी लोळण घालाण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करू