नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? गिरीश महाजन म्हणाले, हे ‘देवा’लाच ठाऊक…
Girish Mahajan : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. रायगडच्या पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना (Aditi Tatkare) तर नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देण्यात आलं होतं. मात्र, नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी नाराजी यावर व्यक्त केली होती. त्यामुळं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय अवघ्या एका दिवसात स्थगित करण्यात आला. यावर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाष्य केलं.
..तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं भाजपला… प्रकाश आंबेडकर यांचा जरांगे पाटलांवर थेट घणाघात
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना सवाल केला असता, महाजन म्हणाले, पालकमंत्रिपदाचा प्रश्न कधी सुटतो, हे मला काय माहिती, हे देवालाच माहिती. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत, असं महाजन यांनी म्हटलं. तसेच, सर्व जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला आहे. फक्त नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पण हा निर्णय देखील चर्चा करून लवकरच सुटेल, असं महाजन यांनी म्हटलं.
मुंबईचे पोलीस हेच खरे भाई; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण, जितेंद्र आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी (२४) नाशिक दौऱ्यावर होते. मालेगाव येथील एका कार्यक्रमात अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ एकाच मंचावर दिसले. यावेळी शाह यांनी भुजबळांना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसायला लावले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही संवादही झाला. त्यामुळं भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली. यावरही महाजन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मला वाटतं की तो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता. तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळं त्या कार्यक्रमाचे सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते. माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष मंत्री देखील राहिलेले आहेत. स्वाभाविकच अमित शहांनी त्यांना खुर्ची दिली आणि त्यात गैर असं काहीच नाही. तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात, मात्र मी एक लहान कार्यकर्ता आहे. त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. भुजबळ साहेब आमच्या वरिष्ठांशी बोलतील, असं महाजन म्हणाले.
महाजनांच्या पालकमंत्रीपदाला कोणाचा विरोध?
भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली होती. मात्र, शिंदे गटातील नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. दादा भुसे यांना पालकमंत्रीपद द्यायला हवे होते, अशी त्यांनी मागणी केली. त्याचप्रमाणे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही नाशिकला स्थानिक पालकमंत्री मिळावा अशी मागणी केली होती.