… महाविकास आघाडीवाले खुश होणार, विधानसभेसाठी जरांगेंकडून भूमिका स्पष्ट

… महाविकास आघाडीवाले खुश होणार, विधानसभेसाठी जरांगेंकडून भूमिका स्पष्ट

Manoj Jarange : ओबीसीमधून (OBC) मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून पुन्हा एकदा या मागणीसाठी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे अमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असणार याबाबत माहिती दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये असणार आहे. आगामी विधानसभेची आपल्या तयारी करायची आहे. याकाळात मी प्रत्येक मतदारसंघाची माहिती घेणार आहे. आपल्याला सर्वच्या सर्व 288 जागांची तयारी करायची आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या इच्छुकांनी तयारीने यावे. असं जरांगे म्हणाले.

जर सर्व समीकरण जुळले तर आपल्याला निवडणूक लढवता येणार, त्यामुळे बारा बलुतेदारांनी एकत्र येत सर्व जाती धर्मांच्या लोकांना निवडून आणायचे आहे. असेही मनोज जरांगे म्हणाले.

जर मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार दिले तर याचा मोठा फटका महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (MVA) होणार आहे. त्यामुळे आता 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

आज पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर देखील टीका केली आहे. जर आपण निवडणूक लढवली तर आपण महायुतीचे लोक होतील आणि नाही लढवली तर महाविकास आघाडीवाले खुश होतील. त्यांची स्टाईल बघा आघाडीवाले म्हणत आहे ओबीसीवर काही बोलू नका. अशी यांची शाळा सुरु आहे आणि दोन्ही आघाड्या आपल्याला वेड्यात काढत आहेत असा टोला देखील पाटील यांनी यावेळी लावला.

‘मुख्यमंत्री कोण होणार याचा विचार केला नाही,’ अजित पवारांच्या डोक्यात कोणती ‘स्क्रिप्ट’? 

तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पाचव्यांदा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. गेल्या वेळी जेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते तेव्हा राज्य सरकारने 13 जुलै रोजी सगे-सोयर अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत संपल्यानंतरही सरकारकडून सगे-सोयर अधिसूचना जारी करण्यात आलेली नसल्याने पुन्हा एकदा आजपासून (20 जुलै) मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube