Ajar Baraskar : सेटिंग फिस्कटल्यानेच मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण; अजय बारस्कर महाराजांचा घणाघात…

राजकीय सेटिंग फिस्कटल्यानेच मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण असल्याचा घणाघात अजय बारस्कर महाराज यांनी केला आहे.

Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी त 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेना थेट सवाल

Ajay Baraskar Maharaj : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पुन्हा उपोषण आंदोलनाचा इशारा देणारे मनोज जरांगे यांच्यावर त्यांचे माजी सहकारी आणि सध्याचे कट्टर विरोधक अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत लाखो मराठा बांधवांना घेऊन गेल्यानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर घेऊन आलात, गुलाल उधळला, विजयाचा जल्लोष केला मग आता पुन्हा उपोषण कशासाठी? असा थेट सवाल बारस्कर यांनी उपस्थित केला आहे.

बंगळुरू ठरला प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ; सलग सहा पराभवामुळे पंजाबची वाट अवघड…

मनोज जरांगे यांना स्वतःचा राजकीय आणि वैयक्तिक फायदा साधता आला नाही, तसेच त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळेच त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळून सतत आंदोलनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही बारस्कर महाराजांनी केलायं. जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठा समाजाला नेमकं काय मिळालं, याचं उत्तर जरांगेंनी द्यावं अशी मागणी बारस्कार यांनी केलीयं.

आपुलकी कर्करोग रुग्णालयाचा प्रकल्प भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

जरांगेमुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेलं…
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील अनेक युवकांचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला. जरांगेंच्या भूमिकेमुळे मराठ्यांचे EWS आरक्षण धोक्यात आले आणि त्याचा फटका हजारो तरुणांना बसला असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीचे उदाहरण देत दावा केला की, कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा युवकांना अधिक गुण असूनही नोकरी मिळाली नाही. उलट कमी गुण असलेल्या मुस्लिम EWS प्रमाणपत्रधारक उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे मराठा युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे असे त्यांनी म्हटले.

शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ

जरांगे हे मराठा योद्धा नव्हे, मुस्लिम योद्धा…
बारस्कर यांनी यावेळी अत्यंत आक्रमक शब्दांत जरांगे यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे हे मराठा योद्धा नाहीत, तर मुस्लिम योद्धा आहेत असा वादग्रस्त आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, बारस्कर यांच्या या टीकेनंतर मराठा आंदोलनाच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे.

follow us