मनोज जरांगे वचपा काढणार?; 1 डिसेंबरला जालन्यात तोफ धडाडणार

मनोज जरांगे वचपा काढणार?; 1 डिसेंबरला जालन्यात तोफ धडाडणार

Manoj Jarange patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी(Manoj Jarange patil) दंड थोपटले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. जरांगे पाटलांच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यातून भुजबळांनी मनोज जरांगे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत सडकून टीका केली. त्यावरुन भुजबळ-जरांगे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता 1 डिसेंबरला जालन्यात मनोज जरांगे पाटलांची तोफ धडाडणार आहे. या सभेतून मनोज जरांगे वचपाच काढणार असल्याचं बोललं जात आहे.

‘शरद पवार संधी असूनही शेवटच्या क्षणी माघारी फिरतात’; पटेलांनी इतिहासाचा पाढाच वाचला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याआधीही जालन्यात जाहीर सभा पार पडली होती. त्या सभेसाठी जवळपास 100 ते 150 एकर शेतजमीनीवर सभा घेतली होती. या सभेसाठी राज्यभरातून लाखो लोकांनी हजेरी लावत जरांगे पाटलांना समर्थन दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची जालन्यात सभा होणार आहे. 1 डिसेंबरला या सभेचं आयोजन केलं असून 70 ते 80 जमीन सभेसाठी मोकळी करण्यात आली आहे. तसेच जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी 10 क्विंटल वजनाचा आणि 50 फूट लांबीचा हार तयार करण्यात आल आहे.

Animal Advance Booking: रिलीज होण्याआधीच ‘ॲनिमल’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्याकडून एल्गार सभाचं आयोजन केलं जातं. जरांगेही मागे हटालया तयार नाहीत. तिसऱ्या टप्यातील दौऱ्यानंतर आता त्यांनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची घोषणा केली. आज पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगेंनी चौथ्या टप्यातील दौऱ्याची माहिती दिली.

मराठा समाजाचा आशिर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा दौरा करणार आहे. 1 डिसेंबर पासून दौऱ्याची सुरूवात होणार आहे. जालना पासून दौऱ्याला सुरूवात होणार असून छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, मलकापूर, खामगाव, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड जिल्ह्यात सभा होणार असल्याचं जरांगेनी सांगितलं. आरक्षण असलेल्या मराठा आणि आरक्षण नसलेयल्या मराठ्यांनी आता आरक्षणासाठी एकत्र यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube