आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात ! चूक झाल्याचं सांगत म्हणाले…

  • Written By: Published:
milind MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली

Maharashtra Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सभागृहात गदारोळ आणि बहिष्कार पाहायला मिळणार की खरंच जनतेच्या प्रश्नांवर खल होऊन ठोस पावलं उचलली जाणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आमदार नसतानाही ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.

वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर नार्वेकर उठून बाहेर गेले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. पण या सगळ्यामध्ये सुरक्षारक्षकांनी नार्वेकर यांना सभागृहात कसे काय सोडले ? असा प्रश्न निर्माण उभा होत आहे

हेही वाचा : अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या

मिलिंद नार्वेकराचं स्पष्टीकरण

नार्वेकर अचानक सभागृहात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो. असंही ते पुढे म्हणाले.

त्यांची आमदार व्हायची इच्छा

नार्वेकर यांच्या या कृतीवर शिंदे गटाच्या नेत्यांनी टोमणा मारला आहे. यावर संजय शिरसाठ म्हणाले की, “त्यांना आमदार होणार असे वाटते.”

संजय शिरसाठ म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून इच्छा आहे की मी आमदार व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार बनवले नाही यात आमचा दोष नाही. मिलिंद नार्वेकर सगळ्यांच्या मधले दुवा आहेत. मिलिंद नार्वेकर लवकर आमच्याकडे येऊ शकतात. त्यांना आमदार होणार असे वाटते.

Tags

follow us