धनंजय मुंडेंचा राजीनामा? अजितदादांनी मौन सोडलं; म्हणाले, माझ्या कामाची..,

धनंजय मुंडेंचा राजीनामा? अजितदादांनी मौन सोडलं; म्हणाले, माझ्या कामाची..,

Dcm Ajit Pawar : माझ्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागील दोन आठवड्यांपासून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आहेत. या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर अखेर अजित पवार यांनी आपलं मौन सोडलंय.

हो, आपण गाफिल राहिलो म्हणूनच…; पवारांकडून जाहीर कबुली अन् संघाच्या कामचं कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणत्याही चौकशीत उद्या तुमच्यावरही आरोप होईल, तुम्ही केसमध्ये दोषी आहात. आता सध्या एसआयटी, सीआयडी न्यायाधीशांची चौकशी सुरु असून जो कोणी दोषी असेल तिथं सिद्ध झालं की त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, या प्रकरणी मी देखील त्यांनी भेटून सांगितलं असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

Delhi Elections : ‘सपा’नंतर CM ममता बॅनर्जींचाही ‘आप’ला पाठिंबा; केजरीवाल म्हणाले, ‘थॅंक्यू दीदी…’

या प्रकरणी पक्ष वेगैर न पाहता वरिष्ठ पातळीवर काम करणारे दोषी असतील तर कोणाचीही गय केली जाणार नाही. मी मुख्यमंत्र्यांच्याच मताचा असून प्रत्येकाची चौकशी कोणा-कोणाला फोन झाले, किती बोलणं झालं हे सगळं समजणार आहे. अशा घटना आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलं असून कोणालाही बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलायं, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कडक सजा करण्यात येईल. नुसते आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या, या संदर्भात माझी सुरेश धस आणि चंद्रशेख बावनकुळे यांच्याशी चर्चा झालेली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. तसेच बीड प्रकरणाची वेगवेगळ्या यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे. याचा विचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत. आरोप करताना विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. सुरेश धस यांचं नाव घेत प्रश्न विचारताच अजितदादा भडकल्याचं दिसून आलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube