आमदार आशुतोष काळेंच्या पाठवपुराव्याला यश; ट्रान्सफॉर्मर अन् वीज वाहिन्यांसाठी 75 लाखांचा निधी…
Mla Aashutosh Kale : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ट्रान्सफॉर्मर आणि वीज वाहिन्यांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी दिली आहे. दरम्यान, या एकूण निधीमध्ये मतदारसंघातील ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीजवाहिन्या, पोल व ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या निधीचा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने ‘दिव्यांग’ मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रम
कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या विजेच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरची समस्या दूर करुन कमी दाबाने होणारा वीजपुरवठा, अशा समस्या सोडवण्यासाठी याआधी आमदार आशुतोष काळे यांनी 1 कोटी 75 लाख रुपये निधी देऊन समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या बहुतांश प्रमाणात विजेच्या समस्या दूर झाल्या आहेत. तरी देखील ज्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता आहे, ज्या वीज वाहिन्या स्थलांतरीत करायच्या, त्यासाठी निधी मिळावा याबाबत आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. आमदार काळेंच्या पाठपुराव्याची दखल घेवून जिल्हा नियोजन समितीमधून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला या कामासाठी 76.32 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
Video : असुरांचा संहार कराया मशाल हाती दे; अराजकीय गाण्यासह ठाकरे विधानसभेच्या मैदानात
या निधीतून मतदारसंघातील कारवाडी येथील ताम्हाणे डीपी येथे नवीन 63 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, दहेगाव बोलका येथील पाणी पुरवठा ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करणे, ब्राम्हणगाव येथील वाकचौरे डीपी येथे नवीन 63 के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, शिंगवे येथील जोशी वस्ती या ठिकाणी नवीन १०० के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे, कोपरगाव बेट भागातील संत जनार्दन स्वामी मंदिर प्रवेशद्वाराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, रवंदे येथील रामदास लामखडे यांच्या वस्तीवरील ११ के.व्ही.वीज वाहिनी स्थलांतरीत करणे,अंजनापूर येथील माऊली डी.पी. येथे नवीन ६३ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर बसविणे,तीनचारी (कोकमठाण) येथील ११ के.व्ही.भन्साळी फिडर एच.टी.लाईन स्थलांतरीत करणे, पोहेगाव बु.येथील पिंपळादेवी ते वत्सल मॉडेल स्कूल पर्यंत स्ट्रीट लाईटचे १५ पोल टाकणे, रांजणगाव देशमुख खालकर मळा येथील डि.टी.सी. लाईन स्थलांतरीत करणे, दहेगाव बोलका समाज मंदिर येथील लाईन स्थलांतरीत करणे, धामोरी येथील नारायण मांजरे घराजवळील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करणे, धोत्रे वीरभद्र विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे, भोजडे गावातील सौ.सुशीलामाई काळे विद्यालय येथील लाईन स्थलांतरीत करणे आदी कामांचा समावेश आहे.
दरम्यान, नागरिकांना येत असलेल्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊने हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत. तर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आभार मानले आहेत.