Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!

Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!

Bharat Gogawale on Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. 19 जूननंतर किंवा त्याआधी विस्तार होईल असे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर आपले मंत्रिपद कन्फर्म असल्याचे थेट जाहीर करून टाकले आहे.

गोगावले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर गोगावले म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जून आधी होणार. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीवरून आले. आता एक मिटींग होणार आहे त्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारू.

सध्या तर सगळेच इच्छुक आहेत. आमच्या वाट्याला जितकी मंत्रिपदे येतील तितकी आम्ही घेऊ. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. दोघे जण दिल्लीला जाऊन आले. तेथे त्यांची काय चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही बोलणे झाले का हे आम्ही त्यांना विचारणार आहोत.

Lok Sabha : मशागत कशी करायची अन् घात कशी साधायची यात वस्ताद : राजू शेट्टींनी थोपडले दंड!

मंत्रिमंडळात महिला मंत्री असतील का या प्रश्नावर गोगावले म्हणाले, यंदा मंत्रिमंडळात महिलांनाही संधी मिळणार आहे. मंत्रिमंडळात दोन ते तीन महिला मंत्री असतील.

जो साब देगा वो हम लेगा

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातही माझे नाव होते. पण त्यावेळी मी थांबलो. आता मला कन्फर्म केले आहे त्यामुळे माझे काम होणार आहे. साब जो देगा वो लेगा हम लोग असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

म्हणून राऊतांना झाली पोटदुखी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री दिल्लीत मुजरा करण्यासाठी जातात असे म्हटले होते. त्यावर गोगावले म्हणाले, आता त्यांच्या पोटात दुखू लागले आहे. दिल्लीला जाऊन राज्यात मोठे प्रकल्प आणले जात आहेत आणि ते यशस्वीही होत आहेत. हे पाहून त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते आता बोलत आहेत बाकी काही नाही.

Lok Sabha : मशागत कशी करायची अन् घात कशी साधायची यात वस्ताद : राजू शेट्टींनी थोपडले दंड!

अमित शाहांच्या भेटीत काय शिजलं ?

काही दिवसांपूर्वी सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. त्यामुळे राज्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

त्यानुसार भाजपचे सहा व शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार अशी माहिती आहे. भाजपच्या सहापैकी चार जण हे कॅबिनेट पदाची तर दोन जण हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. हा छोटेखानी विस्तार असेल अशी माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार दोन कॅबिनेट तर दोन राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे कळते आहे. तसेच उरलेली 13 रिक्त मंत्रिपदे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये भरली जाण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube