संग्राम जगताप राष्ट्रवादीत ‘पॉवरफुल’, थेट पत्रकार परिषदेत पवारांच्या पाठीमागे
Mla Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. पवारांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांमध्ये चलबिचल झाली. युवक कार्यकर्त्यांनी थेट वाय. बी. चव्हाण सेंटरला आंदोलन केले. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील काही आमदार पवारांची मनधरणी करत होते. त्यात अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप हेही होते. जगताप हे थेट शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांच्या पाठीमागे दिसून आले. त्यामुळे जगताप हे राष्ट्रवादीत आणखी पॉवरफुल झाल्याचे स्पष्ट झाले आहे
कार्याध्यक्ष पदाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पवारांनी सविस्तर सांगितले
‘लोक माझी सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह वरिष्ठ नेतेही अचंबित झाले होते. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी नेते मनधरणी करत होते. त्यात नगरचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. संग्राम जगताप यांनीही शरद पवारांची भेट घेतली. राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, तुमची पक्षाला गरज असल्याची विनंती संग्राम जगताप यांनी पवारांकडे केली होती.
अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका
तीन दिवसांपासून संग्राम जगताप हे मुंबईत होते. त्याचबरोबर राज्यातील काही आमदारही मुंबईतच होते. युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आमदार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मागणीनुसार पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या निर्णय मागे घेतला. या पत्रकार परिषदेला आमदार संग्राम जगताप, सक्षणा सलगर, सोनिया दुहन, धीरज शर्मा, आमदार रोहित पवार यांच्यासह काही युवक नेतेही पवारांच्या पाठीमागे बसले होते. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी मिळेल, असे यातून दिसून येत आहे.
याबाबत संग्राम जगताप म्हणाले, पवारसाहेबांनी आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली होती. साहेबांनी आपला निर्णय मागे घेऊन कार्यकर्त्यांचा मान राखला आहे. दुपारी अजित पवार यांचीही मी भेट घेतली असल्याचे जगताप यांनी सांगितले.