‘बुलढाण्याचा बिहार झालायं’…आमदार श्वेता महाले-संजय गायकवाड वाद पुन्हा उफाळला!
बुलढाण्यात आमदार श्वेता महाले आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला असल्याचं दिसून येत आहे.
Mla Shweta Mahale : बुलढाणा जिल्ह्याचा बिहार झाला असल्याचं मोठं विधान भाजपच्या आमदार श्वेता महाले (Mla Shweta Mahale) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाले यांना टोला लगावला होता. आमदार श्वेता महाले ‘बाप तो बाप रहेगा’ गाण्यावर थिरकताना दिसून आल्या. यावर बोलताना संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली. एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे, तर बाई बापासारखं शरीर कुठून आणणार? या शब्दांत गायकवाड यांनी महालेंना डिवचलं होतं. या टीकेनंतर महाले आणि गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा आमदार महालेंनी डिवचलं आहे.
D. Y. Patil PGDM Institute मध्ये सहा दिवसीय AICTE ATAL फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची यशस्वी सांगता
बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमात आमदार महाले बोलत होत्या. पुढे बोलताना महाले म्हणाल्या, बुलढाण्याचा बिहार झालेला आहे. आपल्याला पुन्हा बिहारचा आपला शांत बुलढाणा करायचा आहे. यापुढे बुलढाणा मतदारसंघात कुठेही हुकूमशाही दडपशाही अजिबात चालणार नाही. सत्कार कार्यक्रमाचे आयोजक विजुभाऊ यांच्या पत्नीलाही
उचलून नेण्याची व गायब करण्याची भाषा झाली, असल्याचा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी यादरम्यान केला.
याप्रसंगी बोलताना आमदार श्वेता महाले यांनी माजी आमदार राहुल बोंद्रेंवर टीका केली आहे. आमच्या चिखली मतदारसंघातही एक नटरंग आहे, या शब्दांत
श्वेत महाले यांनी माजी आमदार राहुल बोंद्रेचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार महाले आणि गायकवाड यांच्यातील वाद कमी होताना दिसून येत नाही. गायकवाड आणि महाले यांच्यात सातत्याने आरोप केली जात आहेत. राहुल बोंद्रे हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार होते. या भाजपप्रवेशाची संपूर्ण जबाबदारी श्वेत महाले यांच्यावर होती. परंतू ऐनवेळीच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा बोंद्रे यांना फोन आल्याने बोंद्रे यांनी आपला पक्षप्रवेशाचा निर्णय बदलला होता. हा महालेंना मोठा धक्का मानला गेला.