उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, आमदार यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या पदावर विराजमान व्हावं

MLA Yashomati Thakur : काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर खुद्द माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. प्रथम सत्ताधारी महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी मुख्यमंत्रीपदाबाबर मोठं विधान केलं.
ठरलं! ‘या’ तारखेला‘वनवास’चित्रपट दिसणार सिनेमागृहात; नाना पाटेकर अन् उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या पदावर विराजमान व्हावं, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या.
रविवारी अमरावती येथे महाविकास युवा आघाडीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्याला खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांच्यासह शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, जो 50 कोटी रुपये घेऊन स्वतःच्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतो, तो जनतेचा काय होणार? आताच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? बाळासाहेब ठाकरेंचे जिरंजीव मुख्यमंत्री झाले, ते तुम्हाला सहन नाही झालं, अशी टीका करत उद्धव ठाकरेंनी का नाही मुख्यमंत्री व्हायलं हवं? माझ्या मनातली इच्छा सांगते, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या ठिकाणी विराजमान व्हावं. त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असं यशोमती ठाकुर म्हणाल्या.
मोठी बातमी! ‘परिवर्तन महाशक्ती’ कडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिरोळ, मिरज स्वाभिमानीसाठी
पुढं त्या म्हणाल्या, प्रत्येक कार्यकर्त्याने आपले गाव आणि बूथ सक्षमपणे सांभाळावे. विजय आपलाच असला तरी ही लढाई मोठी असल्याने कोणीही गाफील राहू नये. आता देशाने दुष्ट शक्तींच्या विरोधात पुन्हा पेटून उठण्याची वेळ आली, असं त्या म्हणाल्या.
तो जनतेच्या घामाचा पैसा…
विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी लाखों खर्च करून मोठं मोठं होर्डिंग लावून सरकारचे गोडवे गात आहेत. असं असले तरी निवडणूक जिंगकण्यासाठी भाजप आणि मित्रप पक्षांकडून उधळल्या जात असलेला पैसा हा जनतेच्या घामाचा आहे. याची जाणीव करून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.