देवदास पारोचा सिनेमा हे तर इम्रान हाश्मीचे विचार; महाजनांचा शिंदे गटावर निशाणा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 23T143438.774

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर हल्लाबोल केला आहे. हिंदुूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. जगामध्ये एकमेव हिंदुंचे नेते राज ठाकरे आहेत. आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आम्ही आमच्या धर्माचे संरक्षण करु, असे ते म्हणाले आहेत.

तुम्ही स्वत: ला बाळासाहेबांचे वारस म्हणवता पण तुमच्या सभेत कुराणाच्या आयात म्हटल्या जातात. तुम्हाला नवाब मलिक यांचे समर्थन करावे लागत आहे. हे तुमचे हिंदुत्व आहे का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या गटावर उपस्थित केला आहे. आताचे मुख्यमंत्री हे स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारस म्हणवतात. पण त्यांच्या मिरवणूकीत सर्वांनी पारो व देवदासचा सिनेमा पाहिला आहे. हे तर इम्रान हाश्मीचे विचार आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर देखील टीका केली आहे.

राहुल गांधींच्या फोटोला सत्ताधाऱ्यांनी मारले जोडे; अजितदादा संतापले म्हणाले, असे प्रकार..

तसेच तुम्हाला सत्तेत येऊन दहा वर्षे झाली तरी तुम्हाला हे अनधिकृत बांधकाम दिसले नाही का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. हाच आदर्श घेऊन काशीची ज्ञानवापी मस्जिद व मथुरेची मस्जिद तोडली पाहिजे. ते सुद्धा अतिक्रमणच आहे, असे महाजन म्हणाले आहेत.

फडणवीसांबरोबर पुन्हा युती करणार का ? ; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

दरम्यान, याआधी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा ठाकरे यांनी केला होता. हे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम जर  एका महिन्यात पाडले नाही  तर त्याच्या बाजूला आम्ही गणपती मंदिर उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.

Tags

follow us