मोदी राजीनामा देणार अन् फडणवीस पंतप्रधान होणार; हर्षवर्धन सपकाळांचा दावा
Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार

Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आता पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात जोराने सुरु आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी राजीनामा देणार असून आरएसएसच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याकडे दोन राष्ट्रीय शेठ आहेत. त्या शेठ लोकांना नरेंद्र मोदी यांनी गडगंज केला आहे हे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे कंबोज या व्यक्तीला गडगंज करत आहेत. जेणेकरून पंतप्रधान पदासाठी जेवढा मसाला लागेल तेवढा जमा करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. मुंबई दिल्लीश्वराच्या आदेशाने अदाणीच्या घशामध्ये टाकल्यानंतर उर्वरित मुंबई कंबोज यांना देण्याची प्रक्रिया फडणवीस यांनी सुरू केली आहे. त्यांना एवढी संसाधन दिल्लीत गेल्यानंतर वापरता येईल यासाठी तजवीज केली आहे असं माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले.
मोदी यांना आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत
पुढे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे रेशीम बागेचं वारं हे त्यांच्या कानावर लवकर येतं. तिथून त्यांना संकेत आले आहेत की 75 वर्ष झाल्यानंतर मोदी यांचा राजीनामा आम्ही घेणार आहोत. त्याबाबतच्या सूचना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेशीम बागेतून देण्यात आली असल्याचं सूत्र सांगतात. त्यामुळे मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. असं देखील सपकाळ म्हणाले.
2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून चांगली प्रतिमा
2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची चांगली प्रतिमा होती सध्या ते कोणाचा ऐकून घेत नसले तरी तेव्हाची प्रतिमा त्यांच्या कामी येत आहे. तसेच हिंदी भाषिक प्रांतामध्ये मी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा महाराष्ट्रात लागू केली. हे दाखवून त्यांना हिंदी भाषिक प्रांतांमध्ये आपली स्वीकार्यता वाढून घ्यायची आहे.
पुणे रेल्वे स्थानकात मोठी कारवाई; गुजरातमधील व्यक्तीकडून 51 लाख रुपये जप्त
या सर्व गोष्टी आणि त्यांच्या बोलतानाचा अविर्भाव या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना रात्रीच नाही तर दिवसादेखील पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडू लागली असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.