मुख्यमंत्री बदलाच्या दिल्लीत हालचाली? पत्रकारांच्या प्रश्नांवर पवारांचे कानावर हात
गेल्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्या पार्शभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीमध्ये सुरू असल्याचा दावा केला होता. त्यावर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनाही प्रश्न विचारण्यात आला, त्यावर असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. असं म्हणत कानावर हात ठेवले.
बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) मुद्द्यांवरून आज शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील प्रश्न विचारण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्ली सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे, याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला.
Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं
पत्रकार लोकांना अधिक माहिती
त्यावर शरद पवार म्हणाले की, “मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री बदलायचा निकाल आम्हाला सांगायचं कोणाला कारण नाही. असं काही आहे असं माझ्या कानावरही नाही. हे राऊतांचं स्टेटमेंट असलं तरी ते पत्रकार आहेत, ते तुम्हा पत्रकार लोकांना अधिक माहिती असते.”
मुख्यमंत्री घेणार आज अमित शाहांची भेट
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यात आपल्या गावी मुक्काम ठोकून असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी आज साताऱ्याहून थेट नागपूरला रवाना होणार आहे. अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नागपुरात भेट होणार आहे
मागच्या काही दिवसापासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अजित पवार आणि राष्ट्रवादी यांना जवळ करण्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. असं सांगितलं जात आहे.
Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
याशिवाय राज्यात भाजपकडूनही पदांच्या अदलाबदलीची चर्चा केली जात आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंमत्री करून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यंमत्री करण्यात यावं अशी चर्चा होत आहे. तर येत्या काही दिवसात सत्तासंघर्षावरही सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये सध्याच्या घडामोडींवर राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.