Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा ? डॉक्टर तांबे म्हणाले…
अहमदनगर : सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर प्रश्न विचारला असता. ‘भाजपला आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे निवडणुक तोंडावर आलेली असली तरी सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर संभ्रमवस्था असण्याचे कारण नसल्याचे.’ माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
डॉक्टर सुधीर तांबे पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षक संघटना, डॉक्टर संघटना त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना यांनी सत्यजितला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. सर्वांकडून खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्यापेक्षा माझे मित्र चांगलं सांगू शकतील.
पदवीधर मतदासंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेम पलटी केल्याचं दिसून आलं. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत त्यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना जणू काही आनंदच झाल्याचं चित्र राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर दिसून येतंय. सर्वात आधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यांनतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं जाहीर केलंय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अद्याप भाजपकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला नसून मात्र, भाजपकडून सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्षपणे जाहीर पाठिंबा दिल्याचं समजतंय.
तर आता डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले की, ‘भाजपला आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे निवडणुक तोंडावर आलेली असली तरी सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा दिलेला नाही. यावर संभ्रमवस्था असण्याचे कारण नाही.