धमकी प्रकरणामुळे यंत्रणा अलर्ट; संजय राऊतांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sanjay Raut News : आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठवले होते. या घडामोडींनंतर राऊत यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे पोलिसांचे एक पथक संजय राऊत यांचा जबाब घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहे. ठाणे एसीपी हे संजय राऊत यांचा जवाब नोंदवत आहे. ठाणे पोलिसांच्या सहा जणांचे पथक नाशिकच्या एक्स्प्रेस इन हॉटेल मध्ये दाखल झाले आहेत.तर याच बरोबर नाशिक पोलिसांकडून देखील संजय राऊत यांना सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांनतर नाशिकच्या ग्रामीण भागात खा.संजय राऊत यांचा दौरा असणार आहे तर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून देखील त्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हे वाचा : मला गुंड बोलण्याचा अधिकार Sanjay Raut यांना कोणी दिला ?; राजा ठाकूर यांचा सवाल
शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला दिल्यानंतर दोन्ही गटांतील वाद वाढला आहे. या मुद्द्यावर राऊत कमालीचे आक्रमक झाले आहेत. नवनवीन खुलासे करत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात आता त्यांना धमकी मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात येत आहे.