Maharashtra Politics: ‘शरद पवारांच्या तोंडातून कधी शिवरायांचं नाव निघायचं नाही’, राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics) तसेच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर देखील मोठं भाष्य केले आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) ज्या प्रकारे वागत होते, ते बघून अनेकांना शरद पवार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला आहे. तसेच शरद पवारांच्या तोंडून कधीपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जात नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
२०१४ च्या आधी तेंव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. राज ठाकरे शिवछत्रपतींचे स्मारक बांधायला विरोध करेल का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.
‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’
जो पक्ष, ज्या पक्षाचा अध्यक्ष ज्यांनी परवा दिवशी राजीनामा दिला आणि आत्ता असलेला. या माणसाच्या तोंडातून म्हणजे शरद पवार यांच्या तोंडून एकदाही शिवछत्रपतींचे नाव येत नाही. त्यांची कोणतेही भाषणं काढून पहा तुम्ही. शाहू, फुले आंबेडकर हीच नावं. ते मोठे होतेच त्याबद्दल काही वाद नाही. त्यांची नावं घेतलीच पाहिजे पण सर्वप्रथम आमच्या शिवछत्रपतींचे नाव घेतले पाहिजे ती आमची ओळख आहे.
आम्ही कोण आहोत, तर आम्ही मराठी आहोत. मराठी म्हणजे नेमकं कोण? महाराष्ट्रात राहणारे, म्हणजे आमच्या शिवछत्रपतींच्या भूमित राहणारे, असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.