लादेन जन्मत: दहशतवादी नव्हता, समाजामुळे बनला; आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचं विधान
Ruta Avhad : लादेन जन्मत: दहशतवादी नव्हता, समाजामुळे दहशतवादी बनला असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awahad) यांनी केलंय. दरम्यान, मुंब्रामध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आव्हाड बोलत होत्या.
NCP Sharad Pawar faction leader Jeetendra Ahwad wife defends and eulogises Osama Bin Laden
Compares him to APJ Abdul Kalam!
Says society made him terrorist!
Jeetendra Ahwad had defended Ishrat Jahan (LeT terrorist)
INDI-Congress-NCP Pawar- SP- alliance leaders have routinely… pic.twitter.com/m4YOFqn0O2
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) September 27, 2024
आव्हाड म्हणाल्या, ओसामी बिन लादेनचे आत्मचरित्र वाचा, जसे एपीजे अब्दुल कलाम साहेब बनले, तसाच ओसामा बिन लादेन दहशतवादी बनला. तो का बनला? जन्मता दहशतवादी नव्हता, त्याला समाजाने बनवले, तो चिडून दहशतवादी बनला, असं आव्हाड म्हणाल्या आहेत.
Video: विरोधकांना राजकारण कशाचं कराव याचं भान नाही; मेट्रो उद्घाटनावरून मोहळांचा विरोधकांवर वार
आव्हाड यांच्या या विधानानंतर भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी आव्हाड यांचा हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलायं. या पोस्टमध्ये पुनावाला म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी सार्वजनिक कार्यक्रमात सांगताहेत की, जसं अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र वाचले, तसंच ओसामा बिन लादेनचे आत्मचरित्र वाचा आणि समजून घ्या, लादेन जन्मता दहशतवादी नव्हता समाजामुळे बनला.
जितेंद्र आव्हाडांनी आव्हाडांनी इशरत जहॉंची बाजू घेतली. आता त्यांच्या कुटुंबातील लोकं जगभरात दहशतवादी घोषित आहेत, त्याचे कौतूक करत आहेत, अशी टीका पुनावाला यांनी केलीयं. तसेच ही मानसिकता आहे, अफजल परिस्थितीने पिचलेला, याकूब बिचारा, बरहान वाणी मुलगा, दहशतावाला झाकणे ही स्वभाव बनला असल्याचं पुनावाला म्हणाले आहेत.