Sharad Pawar : ‘भाजपची सत्ता नव्हती, पण पाडापाडी..’; शरद पवारांची बारामतीतून टीकेची तोफ

Sharad Pawar : ‘भाजपची सत्ता नव्हती, पण पाडापाडी..’; शरद पवारांची बारामतीतून टीकेची तोफ

Sharad Pawar : भाजपची सत्ता नव्हती पण पाडापाडी करुन गोवा, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी(Sharad Pawar) टीकेची तोफ डागली आहे. बारामतीच्या गोविंदबाग या निवास्थानी सोलापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, देशात भाजपची सत्ता नव्हती पण पाडापाडी करुन, पक्ष फोडून गोवा आणि मध्य प्रदेशात सत्तेवर आले. कर्नाटकातून त्यांची सत्ता आता गेली आहे. महाराष्ट्रात काय घडलं हे सर्वांनाच माहित आहे, तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सत्ता आहे, पण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, पंजाब राज्यांत भाजपची सत्ता नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

नवाब मलिक कोणत्या गटात? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

मागील काही दिवसांपासून सत्ता पाडण्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली. आधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी(Supriya Sule) भाजपवर हल्लाबोल केला त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता थेट शरद पवारांनी भाजपवर टीकेची तोफ डागलीयं.

NEET Exam : मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी संपवले जीवन; चेन्नईतील घटना

सोलापूर पुरोगामी विचारांचा जिल्हा :
सोलापूर जिल्हा नेहमीच विचारांच्या पाठीशी राहिला. त्यामुळे रामदास आठवलेंना सोलापूर जिल्ह्याने तीन वेळा निवडून दिले होते. सोलापूर जिल्हा रामदास आठवलेंना माहित होता. त्यामुळे हा जिल्हा नेहमीच माझ्या आवडीचा जिल्हा राहिल्याचं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी सोलापूरमधील बोरगावचे उपसरपंच आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube