ओबीसी वाद राज्य सरकार पुरस्कृत होता, मी सुरुवातीपासून ठाम ; विकास लवांडे

ओबीसी वाद राज्य सरकार पुरस्कृत होता, मी सुरुवातीपासून ठाम ; विकास लवांडे

Vikas Lawande On OBC Maratha Reservation Issue : राज्यात विधानसभा निवडणूका (Maharashtra Politics) पार पडल्या आहेत. विकास लांडे (Vikas Lawande) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे म्हणाले की, अखेर सरकारची खेळी यशस्वी झाली. मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाला भाजपाने जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचे नाव चिटकवून दुसरीकडे ओबीसी एकत्र (Reservation Issue) आणले. ओबीसी संघटना शरद पवार आपले शत्रू असल्याचे समजू लागले.

मराठा आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही त्यांचे मंत्री आणि समन्वयक मंगेश चिवटे OSD मार्फत चालवले गेले. संपूर्ण रसद परहस्ते पुरवली गेली. संपूर्ण घटनाक्रम आपण चेक केल्यास सहज लक्षात येते. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कुणाच्या आदेशाने झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तो आदेश मुख्यमंत्र्यांचा होता की गृहमंत्र्यांचा होता ? हे जनतेसमोर आले पाहिजे तेच खरे रहस्य आहे. त्या लाठीचार्जमध्ये महिला ,मुले, तरुण आंदोलकांची डोकी फुटली. अनेकजण रक्तबंबाळ झाले. हे घडल्यानंतर संवेदना असलेला नेता तिथे भेट देणे स्वाभाविक आणि आवश्यक होते. त्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) रोहित पवारांनी भेट दिली आणि तिथेच भाजपाने संधी साधून त्यांची नावे आंदोलनाचे पाठीराखे म्हणून जोडायला सुरुवात केली. मनोज जरांगे दररोज ओबीसी आणि भुजबळ यांना टोकदार टीका करून झोडपत होते.

काँग्रेसनंतर केजरीवालांचाही डाव, दिल्ली निवडणुकीत आघाडी नाहीच; स्वबळावर लढणार

मराठा आंदोलनाला देवेंद्र फडणवीस अजित पवार कधीच भेटले नाहीत. दुसरीकडे छगन भुजबळ ,पडळकर , लक्ष्मण हाके वगैरे भाजपचे अनेक नेते ओबीसी एकत्र करण्यात सक्रिय होते. अनेक मेळावे घेतले. मनोज जरांगे जसे ओबीसी नेत्यांना लक्ष करून टीका करत होते, तसे ओबीसी एकत्र होत होते. कारण ओबीसीचे राजकीय आरक्षण आधीच संपुष्टात आलेले होते. त्यांना मराठ्यांची भीती वाटत होती, कारण तशी भीती सरकारनेच दाखवली होती. जरांगे यांचे वारंवार उपोषण आणि वारंवार खोटी आश्वासने हे जाणीवपूर्वक केले गेले. मुंबईकडे मराठा आंदोलकांना घेऊन जरांगे निघाले. नवी मुंबईत आंदोलन अडवले मध्यरात्री मंगेश चिवटे मार्फत सर्व समन्वय केला जात होता. सग्या सोयरेंबाबत अधिसूचना काढून मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. जरांगे ते पत्र घेऊन माघारी फिरले राज्यात मराठा खुश ओबीसी नाराज अशी स्थिती तयार झाली. नंतरच्या काळात विरोधी पक्षांनी विशेषतः शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी असा आग्रह भाजपाने धरला. शरद पवारांनी 3/4 वेळा सांगितले की संसदेत कायदा करून आरक्षणाची 50% मर्यादा उठवावी लागेल. पण तो मुद्दा माध्यमांनी आणि सरकारने चर्चेत घेतला नाही, हे विशेष होते.

भुजबळ विरुद्ध जरांगे हा सामना लोक चवीने ऐकत होते. मात्र, ‘ओबोसी विरुद्ध मराठा’ असे कधी नव्हे ते दूषित आणि भेदभावाचे वातावरण राज्यात निर्माण झाले. आरक्षणाबाबत प्रत्यक्षात आजपर्यंत काहीही झाले नाही. जरांगे शरद पवारांसह सर्वांवर टीका करत होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर एकदाही ब्र शब्द टीकात्मक बोलले नाहीत. एकनाथ शिंदे मराठा चेहरा बनवला गेला, तेच जरांगे यांचे पाठीराखे असल्याचे निरीक्षण केल्यावर दिसते. ते वर्षभरातील बनवलेले भावनिक वातावरण सत्य समजून घ्यायला तयार नव्हते. अनेक घटनाक्रम सांगता येतील, पण सर्व सविस्तर लिहणे शक्य नाही. पण महायुतीने विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि जरांगे पुरस्कृत मराठा मते मिळवली महायुतीचे काम फत्ते झाले.

ICC च्या अध्यक्षपदाची धूरा जय शाहांच्या हाती, पदभार स्वीकारताच काय म्हणाले?

मराठा ओबीसी दोघेही महायुतीने कसे वापरून घेतले, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 2023-24 हे वर्ष पुढील काळात लक्षात ठेवावे लागेल. जातीयवाद वाढवला सर्वजण एकमेकांकडे संशयाने पाहून जात विचारू लागले. आरक्षणाच्या निमित्ताने जातीय अस्मिता टोकदार बनल्या. जगण्याचे सर्व प्रश्न विसरायला मदत झाली, हेच भाजपा-आरएसएसचे यश आहे. यात भाजपाने आपल्या विविध चेहऱ्यामार्फत शरद पवारांना अपप्रचार करून बदनाम करण्याची कायमची मोहीम याही वेळी यशस्वी केली, हे नाकारता येत नाही. ज्या शरद पवारांनी मंडल आयोग लागू करण्यात महत्वाची भूमिका बजावली. ज्यात राज्यातील कुणबी सह 346 ओबीसी जातींना आरक्षण मिळाले मात्र भाजपाने जाहीर विरोध केलेला होता. हे सर्व ओबीसी नेते विसरले आणि दुसरीकडे भाजपच्या अपप्रचाराला बळी पडून मराठा युवक शरद पवारांना शत्रू समजू लागले. त्याचवेळी ओबीसी पण शत्रू मानू लागले. भाजपाने दोन्हीकडे केवळ बुद्धिभेद केला. त्यात दोन्हीकडील अर्धवटराव बळी पडले.

दुसरीकडे शाश्वत सर्वांगीण विकासाच्या किंवा बेरोजगारी, महागाई ,शेती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महिलांची सुरक्षा, वाढती व्यसनाधीनता ,गुन्हेगारी इत्यादी ज्वलंत प्रश्नांवर कोणत्याच जातीय संघटना कधीच भूमिका घेत नसतात हे पुन्हा सिद्ध झाले. निवडणूक झाली, मात्र जातीयवाद वाढीस लागला. मनोज जरांगे एकखांबी मराठा नेतृत्व त्यांच्या रोजच्या बोलण्याने ओबीसी संघटन मजबूत करण्यात यशस्वी झाले बाकी त्यांच्या मागण्या नेहमीप्रमाणे वेळोवेळी बदलत राहतील. यश कधी मिळेल हे त्यांचा ‘ नाथ ‘ त्यांना सांगेल, असं विकास लवांडे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube