‘भाजप एक पिडा, दूर करण्यासाठी पाहिजे तेवढी किंमत अन्..,’; पवारांची दिल्लीतून जळजळीत टीका

‘भाजप एक पिडा, दूर करण्यासाठी पाहिजे तेवढी किंमत अन्..,’; पवारांची दिल्लीतून जळजळीत टीका

Sharad Pawar On BJP : संसदेच्या सुरक्षेवरुन संसदेत शिस्तभंगाचा ठपका ठेऊन विरोधी पक्षाच्या तब्बल 140 खासदारांना सत्ताधाऱ्यांकडून निलंबन करण्यात आलं आहे. त्यावरुन आता रणकंदन सुरु झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून (India Alliance) दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्यावतीने संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आयोजित छोटेखानी सभेतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर जळजळीत टीका केली आहे.

संसदेत घुसखोरीवेळी भाजप खासदार पळून गेले; गौप्यस्फोट करत Rahul Gandhi मीडियावर भडकले

भाजप एक पिडा,अन् लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या सामुदायिक शक्तीला दूर करण्यासाठी पाहिजे तेवढी मेहनत आणि किंमत देणार असल्याची टीका शरद पवारांनी केली आहेत. तसेच संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करुन विरोधकांचा आवाज बंद करु शकतो, असं सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

LPG Price : गुडन्यूज! नववर्षाआधीच LPG गॅसच्या दरात मोठ्ठी कपात; व्यावसायिकांना दिलासाa>

देशात लोकशाही टिकवण्यासाठी देशातील सर्वच पक्ष, व्यासपीठावर बसलेले नेते तयार आहेत. देशातील विविध राज्यांतील गावागावांत जाऊन शेतकऱ्यांची अवस्था बघा काय झालीयं. अनेक तरुणांवर बेरोजगारीची वेळ आलीयं, गावातील लोकं दलित असो किंवा आदिवासी अनेक अवहेलना सोसत असून ते दुखी आहेत, त्याची पिडा एकच ती म्हणजे भाजप पक्ष असल्याची टीका त्यांनी केलीयं.

जम्मू-कश्मीर : सेनेचे जवान घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवादी हल्ला, पाच जणांना वीरमरण

दरम्यान, लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या सामुदायिक शक्तीला दूर करण्यासाठी आम्ही पाहिजे तेवढी मेहनत करु, पाहिजे ती किंमत देऊ, तसेच आम्ही एकत्र राहणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी दिला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांच्या भाषणानंतर त्यांनी स्वत: राहुल गांधींना बोलण्यासाठी येण्याची घोषणा व्यासपीठावर केली आहे.

WFI Elections 2023 ; ब्रिजभूषण सिंह यांच्या निकटवर्तीयाकडे कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, सीताराम येचुरी, मनोज झा, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अधीर रंजन, डी राजा, त्रिची शिवा, रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी, जॉन ब्रिटास, संजीव अरोड़ा, सुशील रिंकू आदी नेते उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube